"मुझिक मित्रा तर्फे म्युझिक शो उत्साहात संपन्न"
डोंबिवली:प्रतिनिधी-
संगिताची आवड असणा-या संगितप्रेमी डोंबिवलीकरांसाठी मुख्य संयोजक व जेष्ठ गायिका शर्मिला केसरकर यांनी नुकताच सर्वेश सभाग्रुहात ये दिल लाया है बहार हा मुझिक शो आयोजित केला होता.या सदाबहार संगितमय कार्यक्रमात गायक व गायिका यांनी आपल्या सुमधुर आवाजाने डोंबिवलीकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले.विविध गाण्यांवर श्रोत्यांधीलच महिलांना नाचण्याचा मनमुराद आनंद लुटाला.या संगितमय कार्यक्रमाला शैक्षणिक,सांस्क्रुतिक,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सर्वाच आँर्केष्ट्रामधील सिंगर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल.आँर्गनायझर व सिंगर शर्मिला केसरकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच सुत्रसंचलन उत्तम राणे यांनी केले.

.jpg)
0 टिप्पणियाँ