..
मायणी प्रतिनिधी -------- मायणी ता.खटाव येथे काल रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान सद्गुरु सरुताई मठापासून जवळच असलेल्या चोथे यांच्या वस्तीजवळ तरस या प्राण्याचे दर्शन बंडू खांडेकर व अन्य दोघांना झाले. हा प्राणी साधारणपणे माणसाच्या कमरे एवढा होता. तो शेळ्या -मेंढ्या व लहान प्राण्यावर हल्ला करु शकतो. पहाटेच्या वेळी मायणी मधील काही नागरिक या रस्त्याने फिरायला जातात त्यांना हे धोक्याचे आहे. त्यामुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच रस्त्यावर अभयारण्य आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिक करीत आहेत. -

.jpg)
0 टिप्पणियाँ