माण - खटाव विधानसभा मतदारसंघात एकुण अकरा उमेदवार |
आमचं ठरलंय मधून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी |म्हसवड दि.७ प्रतिनिधी
माण विधानसभा मतदार संघात आज १६ पैकी ५ लोकांनी अर्ज माघारी घेतल्याने ११ अर्ज शिल्लक राहिले असून गेली अनेक दिवस आमचं ठरलंयचा चाललेला खल आज मिटला असून अनिल देसाई रणजित देशमुख संदिप मांडवे यांनी शेवटच्या क्षणी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने प्रभाकर देशमुख हेच उमेदवार रहाणार हे स्पष्ट झाले निवडणुकीत उभे असलेले उमेदवार पुढील प्रमाणे
शेखर भगवानराव गोरे (शिवसेना) धनुष्यबाण
नारायण तातोबा काळेल (बहुजन समाज पार्टी) हत्ती,
जयकुमार भगवानराव गोरे (भारतीय जनता पार्टी) कमळ,
डाॅ. प्रमोद रामचंद्र गावडे (वंचित बहुजन आघाडी)गॅस सिलिंडर
राजकुमार साधू माने (बहुजन महा पार्टी) शिट्टी,
नानासो रामहरी यादव (भारतीय प्रजा सुराज पक्ष)कपबशी,
अमृत पोपट सुर्यवंशी (बहुजन मुक्ती पार्टी) खाट,
तर अपक्ष
संदीप जनार्दन खरात (अंगठी)
प्रभाकर कृष्णाजी देशमुख (टेबल)
डाॅ. संदीप आनंदराव देशमुख (सिरींज),
हणमंत सावळा देशमुख (ट्रॅक्टर)
असे चिन्ह मिळाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिली.

.jpg)
0 टिप्पणियाँ