लोणंद येथे १२ ब्रास बेकायदेशीर वाळू जप्त"


"लोणंद येथे १२ ब्रास बेकायदेशीर वाळू जप्त"
लोणंद:प्रतिनिधी:


लोणंद पोलीस ठाण्यामध्ये 12 ब्रास वाळू अंदाजे किंमत साठ हजार रुपये किमतीची जप्त  केली.

पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी,की ,
16 नोव्हेंबर रोजी रात्री  मरीआई ची  वाडी मधील गट क्रमांक 179 मध्ये विक्रम शामराव धायगुडे पिंपरे बुद्रुक यांनी बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने 12 ब्रास  साठ हजार रुपये किमतीची वाळू साठा केला होता. हा साठा महसूल पोलीसांनी जप्त केला आहे.

याबाबत विजयकुमार बोबडे मंडलाधिकारी यांनी फिर्याद दिल्याने लोणंद पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 महाराष्ट्र महसूल अधिनियम 166 कलम 48 ऑब्लिक 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार डी.एच. मुळीक करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ