औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
औंध :औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील औंध ग्रामपंचायत सदस्य मा. तानाजी इंगळे यांच्या प्रयत्नाने तर औंध ग्रामपंचायत वतीने मातंग समाजातील विविध कामे मार्गी झाल्याचे ग्राम. सदस्य तानाजी इंगळे यांनी सांगितले आहे. यामध्ये मातंग समाजातील असणारे बंदिस्त गटारे, मिनी वॉटर स्कीम,तसेच मातंग समाजातील सार्वजनिक शौचालाय दुरुस्ती असेल आशी विविध कामे मार्गी लागली असून पुढील काळात आम्ही बौद्ध विहार नवीन बांधणी, मातंग समाजातील बंदिस्त गटारे, तसेच काँट्रीक रस्ता, चर्मकार वस्ती येथे बंदिस्त गटारे तर काँट्रिक रस्ता तसेच बेघर वस्ती काँट्रीक रस्ता एवढी कामे लवकरच मार्गी लावत आहोत.त्यांनी औंध ग्रामपंचायतिचे आभार व्यकत करत समाजातील आशी अनेक विविध कामे इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
समाजाने ज्या पद्धतीने मला निवडून देत माझ्यावर जो विश्वास दाखवला होता तोच विश्वास जपत मी कार्य केले आहे असे ही त्यांच्या कडून सांगण्यात आले.
येणाऱ्या काळात सुद्धा माझ्या समाजावरील येणाऱ्या अडचणी मी सोडवून त्यामधून कसा मार्ग काढता येल यासाठी मी कायम कटीबद्ध राहीन असे ही तानाजी इंगळे यांनी सांगितले.
.jpg)
0 टिप्पणियाँ