लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे नंतर मलठण साठी दुसरी टाकी मा.खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर व श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीच बांधण्यास घेतली - नगरसेवक अशोकराव जाधव
फलटण ...वार्ताहर..
फलटण नगर परिषद वार्ड क्रमांक 3,4 व 5 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ मा.खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे व श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते पार पडला
मलठण मधील ढोर गल्ली येथील बंदिस्त काँक्रिट गटार 34 लाख, लोहार गल्ली येथील काँक्रीटीकरन 39 लाख, गणेश नगर येथील काँक्रीटीकरन 36 लाख, संतोषी माता मंदिर रोड रस्ता डांबरीकरण 24 लाख व मलठण चे अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा व जुनी टाकी काल बाह्य झाल्या मुळे नविन 10 लाख लीटर ची टाकी बांधण्याचा शुभारंभ 1 कोटी 25 लाख अत्यंत उत्साहात पार पडला
कार्यक्रमासाठी मलठण मधील सर्वच प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब भोसले,अशोकराव भोसले, शरद सोनवणे,बाळासाहेब घनवट सर दत्तराज व्हटकर, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर,बाळासाहेब कुंभार, सुनिल घोलप डॉ. प्रवीण आगवणे, संतोष सस्ते,अभिजित नाईक निंबाळकर, राजाभाऊ नाटीले, राजाभाऊ निंबाळकर, अमोल घाडगे, नितिन जगताप, सागर लंबाते, बबलु पवार, विशाल राहिगुडे,रवि पवार, दत्तराज थोरात,सागर निंबाळकर, जयवंत शिंदे, प्रवीण भोसले, अजित गायकवाड सर,अभिजित व्हटकर , अनिकेत कदम,संग्राम अहीवळे, डॉ.विक्रम शिंदे,गणदास काका, किरण राऊत, नितिन वाघ , सुरज तांदळे, दिगंबर भोरे , आशिष भोसले, उमेश रणदिवे व इतर सर्व मलठणकर नागरिक उपस्थित होते
.jpg)
0 टिप्पणियाँ