कोरेगावात आ. महेश शिंदे यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांचे बंड

कोरेगावात आ. महेश शिंदे यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांचे बंड... .           

.                       आमदार महेश शिंदे.
 

 (अजित जगताप )         
 सातारा दि: शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर कोरेगाव विधानसभा मतदार सघाचे  महायुतीचे आमदार पद भूषवणारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात आता कोरेगाव मतदार संघातील जुने व निष्ठावंत शिवसैनिकांनीच बंड पुकारले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आ. शिंदेंना शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटातूनच  विरोध होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.                 
     सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या वाटचालीबाबत विचार मंथन करण्यात आले. या वेळेला कोरेगाव मतदार संघातील निष्ठावंत व  जुने शिवसैनिक जालिंदर गोडसे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना स्पष्टपणे सांगितले की, आमदार महेश शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी खूप मोठे परिश्रम घेतले होते .दुसऱ्या पक्षातून येऊन सुद्धा त्यांना आमदार केले. परंतु, ते यापूर्वी ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ना भारतीय जनता पक्ष,  ना शिवसेनेचे राहिले. त्यामुळे आता त्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी शिवसैनिकच पुढाकार घेतील. आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये एकही शिवसेनेची  शाखा त्यांनी काढलेली नाही. त्यांना आता आगामी विधानसभा निवडणुकीत जागा दाखवण्याची वेळ आली असून शिवसेनेच्या चिन्हावर आम्ही सुद्धा निवडणूक लढवून आमदार होऊ शकतो. असाही गर्भित इशारा दिलेला आहे. 
      या महत्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार यांच्यासह कोरेगावचे युवा नेते रणजीतसिंह भोसले, अमोल आवळे, बाळासाहेब मुलाणी, वासुदेव माने, प्रदीप माने, विकास शिंदे व महिला पदाधिकारी सुलोचना पवार, नीता लोंढे, संगीता पवार यांच्यासह सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील पाटण, कोरेगाव व वाई- महाबळेश्वर- खंडाळा, फलटण या चार मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट महायुतीतून दावा करू लागलेले आहेत. त्यामुळे भविष्यात महायुतीमध्येच रस्सीखेच होत असताना आता प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत मतभेदाने सुद्धा राजकारण लागणार असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.
-------------&-------------------------------

फोटो- सातारा शासकीय विश्रामगृह येथे  आ. महेश शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेताना निष्ठावंत शिवसैनिक जालिंदर गोडसे (छाया- अजित जगताप, सातारा)

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ