विरोधकांना लाडक्या बहिणींनी दिली चपराक - आ.जयकुमार गोरे
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
महायुतीच्या सरकारची महत्वपूर्ण असलेली लाडकी बहिण योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली असली तरी वडूज येथील सोहळ्यास भगिनिंनी दाखवलेल्या उपस्थितिने विरोधकांना मोठी चपराक दिली असल्याचे आ.जयकुमार गोरे यांनी केले
या कार्यक्रम प्रसंगी अंकुश गोरे, तहसीलदार बाई माने,सोनिया गोरे, डॉ. दिलिप येळगावकर, प्रा. बंडा गोडसे, धनंजय चव्हाण, सदाशिव खाडे, नगरसेविका रेश्मा बनसोडे,स्वप्नाली गोडसे, विक्रम रोमण, श्रीकांत बनसोडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरे पुढे म्हणाले खटाव माण तालुक्यातील जनतेने माझ्यावर आज अखेर निस्सिम प्रेम केले त्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न सुरु केला आहे. आजपर्यंत मोदी सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करण्यात आला माझी लाडकी बहिण यापासून वंचित राहू नये म्हणून व तिच्या प्रपंचाला हात लागावा म्हणून सरकारने हि योजना कार्यान्वयीत केली या योजनेमुळे विरोधकांची पोटदुखी सुरु झाली परंतु पंतप्रधान मोदी यांनी बहिणींच्या प्रपंचाचा आणखी एक भार हालका केला वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर देऊन खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे.येथील स्वाभिमानी जनतेने महायुतीच्या पाठीशी रहावे असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
पाणी व विकासा पासून खटाव - माणला वंचित ठेवण्याचे काम फलटण व बारामतीकरांनी केले असून गत दहा वर्षात पाणी आणण्याचे काम भाजप सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले . यामुळे खटाव तालुक्यात ७०% पाणी आणले. भाजप सरकारच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत . लाडक्या बहिण योजनेचे हफ्ते वेळेत आलेत व वेळेतच येणार आणि योजना सुरु राहणार . याबाबत विरोधकांनी तिळमात्रही शंका निर्माण करू नयेत असा उपहासात्मक टोलाही आमदार गोरे यांनी लगावला .
या सन्मान सोहळ्यादरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व सहकार्यानी मराठी गीते सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली . तर या कार्यक्रमाचा महिला भगिनींनी मनमुराद आनंद ही लुटला . महिला भगिनींची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार गोरे कार्यक्रमातून संयोजकांना सुचन देत स्वतःही काळजी घेताना दिसुन येत होते .
चौकट -
दुष्काळी दुष्काळी हिणवणारे आता नाते संबंध जोडू लागलेत
खटाव - माण हा कायम दुष्काळी भाग म्हणून, हिनविणार्यांना महायुती सरकारच्या काळात तालुका जलमय करुन दाखवला. त्यामुळे आता फलटण व बारामतीकर इकडे सोइरीक करू लागले असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात आ. जयकुमार गोरे यांनी करताच उपस्थित महिला वर्गातून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
फोटो -
वडूज येथील लाडकी बहिण सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलताना आ. जयकुमार गोरे
.jpg)
0 टिप्पणियाँ