मायणी प्रतिनिधी----
--27 फेब्रुवारी 2012 मध्ये संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना करून गुरुकुल ज्योतिष ज्ञान पिठा मार्फत गेली बारा वर्षे ज्योतिष विशारद, ज्योतिष भास्कर, पंडित, ज्योतिर्विद्या वाचस्पती पर्यंत शिकवणारे डॉक्टर विकास खिलारे सातारा यांना यंदाचा आदर्श शिक्षकाचा ज्योतिष ब्रहस्पती पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार श्रीराम नक्षत्र मंडळ संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या ज्योतिर्विद्यांचा स्नेह मेळाव्यात देण्यात आला. नारायण रंगनाथ पूर्णपात्रे यांच्या स्मरणार्थ वेदमूर्ती मोहन शास्त्री पूर्णपात्रे यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात गुरुवर्य कैलासवासी प्र, सु , आंबेकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार म्हणजेच ज्योतिष बृहस्पती पुरस्कार डॉक्टर विकास खिलारे यांना प्रदान करण्यात आला मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते त्यांचा हा सत्कार वेदमूर्ती प्रिया मालवणकर यांच्या हस्ते व वेदमूर्ती मोहन पूर्णपात्रे तसेच डॉक्टर प्रसन्न मुळे, व महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला या सत्कार सोहळ्यास सौ पुष्पलता शेवाळे, डॉक्टर चंद्रकांत जोशी, अंजली पोतदार, सुनिता पागे, श्रीराम धानोरकर, प्रसन्न जी मुळे, आनंद पांडव संतोष आंबवले, प्रतीक जोशी, विजय कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी नंदकिशोर जोशी, नंदकिशोर बोराडे, अनिल चांदवडकर, उपस्थित होते शेवटी पुरुषोत्तम लोहगावकर यांनी
.jpg)
0 टिप्पणियाँ