भाजपाचे उमेदवार जयकुमार गोरे यांची विजयाची हट्रीक.


जयकुमार गोरे याची ३०४३ विजयाची हट्रीक.



म्हसवड: प्रतिनिधी:

माण खटाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी २७ व्या फेरी अखेर ३०४३ मतांनी विजय मिळवून विजयाची हट्रीक केली आहे.
त्यांना 91 हजार 469 मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार प्रभाकर कृष्णाजी देशमुख  यांना 88 हजार 426 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार शेखर भगवानराव गोरे याना 37 हजार 539 मते मिळाली आहेत.
शेवटच्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी कडवी झूंज देत निकराचा सामना केला,अखेर शेवटच्या फेरीत जयकुमार गोरे यांनी मतांची आघाडी कयम ठेवत विजयावर शिक्का मोर्तब केले.
पहिल्या फेरी पासून च जयकुमार गोरे यांनी आघाडी घेतली होती. माण तालुक्यातील केंदावर साधारण १६ व्या फेरी अखेर 13हजार 637 मताची आघाडी मिळवली होती. मात्र त्यानंतर खटाव तालुक्यातील मतदार केंद्रातील मतमोजणी सुरु झाली यामध्ये आघाडी कमी होत गेली. मात्र अखेर ३०४3 मतांनी जयकुमार गोरे यांनी विजय मिळवला आहे.



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ