सिद्धनाथ-जोगेश्वरी हळदी समारंभ संपन्न
म्हसवड:प्रतिनिधी:
सालबाद प्रमाणे या वर्षी कार्तिक शुध्द प्रतिपदा 28 ऑक्टोबर रोजी श्रीसिध्दनाथ मंदिरात देवाला हळदी लावण्याचा समारंभ संपन्न झाला
या दिवशी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. श्री सिध्दनाथ व जोगेश्वरी देवाचा विवाह सोहळा संपन्न 9 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कार्तिक शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु.प्रतिपदा या तब्बल एक महिना चालणाऱ्या शाही मंगल विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेने होतो. त्याच दिवशी दुपारी10 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूंच्या उत्सव मूर्तिंना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ शाही थाटात झाला.
दिवाळी पाडव्यादिवशी सकाळी 10 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात एका छोटेखानी दिवानावर श्रींच्या पंचधातूंच्या ऊत्सवमूर्ती स्थानापन्न करण्यात आली होती.
परंपरागत प्रथेनुसार मुख्य पुजारी सुनील गुरव यांच्या पत्नी सालकरीणबाई सौ. गुरव यांच्या हस्ते सर्वप्रथम श्रींना हळदी लावण्यात आली. त्यानंतर गुरव समाजातील, शहरातील व परगावहून आलेल्या हजारो महिलांनी श्रींना हळदी लावली.
ढोल, ताशा,सनई-चौघडा आदी मंगल वाद्यांच्या गजरात हा हळदी समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी हजारो भक्त हजर होते.
श्रींच्या मूर्तींना लिंबू,दही,दूध,तूप,पंचामृत व गरम उदकाने अभ्यंगस्नान घालण्यात आले नंतर या मूर्ती मूळ ठिकाणी स्थानापन्न करण्यात आल्या. यावेळी मंदिराच्या
गाभाऱ्या समोर म्हातारे देव समोरच घटस्थापना करण्यात आली. श्री सिध्द नाथ भक्ताचे 12 दिवसाचे उपवास यावेळी प्रारंभ होतो.

.jpg)
0 टिप्पणियाँ