परतीच्या पावसाने माणचा दुष्काळ हटला, राजेवाडी तलाव भरला.
म्हसवड: प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या पावसाने माण तालुक्यातील पाझर तलालातील पाणी साठा वाढला असुन तालुक्यातील नाले,ओढे भरुन वाहत आहेत. माण नदीवर असलेला राजेवाडी तलाव गेल्या दहा वर्षात प्रथमच भरुन वाहू लागला आहे.
राजेवाडी हा इंग्रज काळात बांधलेला मातीचा तलाव असून माण तालुक्यात याचा पाणी साठा होतो, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील गावांना पाण्याचा लाभ होतो. माण तालुक्यातील बँक वाँटर मुळे देवापुर, पळसावडे, हिंगणी,ढोकमोढा या गावातील शेतकऱ्यांना पाणी मोठ्या प्रमाणात मिळते. तर येथे सामुदायिक शेती केली जाते याचा ला्भ माण तालुक्यातील या देवापुर, पळसावडे, हिंगणी,ढोकमोढा,म्हसवड परिसरातील शेतकऱ्यांना होतो.
राजेवाडी हा दिड टि एम सी पाणी साठवण क्षमतेचा तलाव आहे.
ब्रिटिशकालीन या तलावाला सुमारे एकशे चाळीस वर्षे होऊन गेली .परंतु या तलावाकडे कायमच शासनाचे दर्लक्ष आसते.भराव्या भवती चिलारीच्या विळख्यात आपले वास्तव्य जपुन ठेवणारा तलाव 2011 पासून हा तलाव गाळाने भरलेला कोरडा ठणठणीत होता.मात्र यावर्षी हा पुर्ण भरलेला आहे.

माण तालुक्यात सलग पडलेल्या दुष्काळामुळे तालुक्यातील विहिरी आटल्या होत्या, तर तालुक्यातील ओढे कोरडे पडले होते. माण तालुक्यातील जीवनदायिनी असलेली माण नदी गेली तीन वर्षे कोरडी पडली होती. दरम्यान पुराचे वाहून जाणारे पाणी माण नदीत सोडल्यामुळे गोंदवले खालील पळशी पासून चा भाग पाण्याखाली आला होता. तर पळशी पासून म्हसवड पर्यंतचे कोल्हापूर टाईप बंधारे भरले होते. दरम्यानच्या परतीच्या पावसाने पुन्हा जोर केल्याने माण नदी वाहू लागली आहे, तर इंग्रज काळात बांधलेला दहिवडी शेजारचा पिंगळी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. १८८७ साली माण तालुक्यात मोठा दुष्काळ पडलेला होता. लोकांना काम देण्यासाठी इंग्रजी सरकारने हा पिंगळी तलाव स्थानिक मजूरांना काम देऊन बांधला हे पहिले रोजगार हमीचे काम इंग्रजांनी केले. या तलावाची पाणी साठवण क्षमता समारे २-३५ दशलक्ष घनफुट इतकी आहे. या तलावाच्या खाली सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्राला लाभ होतो आहे. परिसरातील पिंगळी, गोंदवले, दहिवडी, वाघमोडे वाडी येथील शेतकऱ्यांना लाभ होतो आहे.
आंधळी हा माण नदीवरील मोठा तलाव आहे, मागच्या आठवड्यात हा तलाव भरल्यामुळे माण नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली होती, त्यामुळे माण नदीला पूर आला होता.
मासाळवाडी,गंगोती,वगळता इतर पाझर तलाव ६०-७० भरले आहेत, मासाळवाडी,गंगोती हे अद्याप३० टक्के भरले आहेत. मात्र पुढच्या काळात हे तलाव भरण्याची शक्यता आहे.
परतीचा पावसाने तालुक्यातील कांदा पिकांची नासाडी झाली असून माण तालुक्यातील कांदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. तर अद्याप तलाठ्यांनी नुकसान भरपाई करण्यासाठी पंचनामे केले नसल्यामुळे शेतकरी वर्ग संतापला आहे. शासकीय यंत्रणा निवडणूक कामात गुंतल्यामुळे शासनाने अद्याप नुकसान भरपाई चे पंचनामे करण्यासाठी आदेश पारित केले नाहीत.
तर माण तालुक्यातील जनावरांना शेड नसल्यामुळे अनेक जनावरे आजारी पडली असून दुष्काळात जीवाच्या आकांताने जगविलेले पशुधन ओल्या दुष्काळात गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.

.jpg)
0 टिप्पणियाँ