औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
वर्ये येथील रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटयूड ऑफ मॅनेजमेंट रिसर्च सातारा आणि क्विक हिल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पा अंतर्गत विदयार्थीनी कुमारी श्रद्धा कुंभार व कुमारी तमन्ना मुलाणी यांनी सातारा भाजी मंडई सातारा येथे जाऊन सायबर गुन्हे कसे होतात.
तसेच तसे झाल्यास आपण काय केले पाहिजेल याचे धडे तेथील असणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्राहकांना देत जनजागृती केली.
वेगवेगळ्या सायबर गुन्ह्याची माहिती करून देणे तसेच त्या गुन्ह्यापासून कसे सुरक्षित राहिले पाहिजे याची माहिती देण्यासाठी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पा अंतर्गत जनजागृती करत लोकांना मदत केली आहे.
लोकांना फायनाशियल फ्रॉड, सोशल फ्रॉड, या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात आल्या आणि यावर सायबर गुन्हा घडल्यावर आपण कुठे रिपोर्ट करावे यांचीही माहिती तेथील शेतकरी तसेच ग्राहकांना देण्यात आली. दिलेल्या सर्व माहिती मुळे मंडई मध्ये असणाऱ्या शेतकरी वर्गा कडून तसेच ग्राहकांकडून श्रद्धा आणि तमन्ना चे कवतुक करण्यात आले.
.jpg)
0 टिप्पणियाँ