औंध गावाचे सुपुत्र दत्ताभाऊ जगदाळे यांचे आज पासून बेमुदत उपोषण*


औंध प्रतिनिधी - ओंकार इंगळे 

औंध : औंध सह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेस शासनाने तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दयावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांचे आज रोजी 22 सप्टेंबर 2024 औंध बाजार पटांगण ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषण चालू झाले आहे.
सन -2012 पासून औंध सह 16 गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्ह्णून दत्ताभाऊ जगदाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. मागील तेरा वर्षा पासून या योध्याचा औंध सह 16 गावातील लोकांसासाठीचा संघर्ष हा चालू आहे.
पुन्हा एखादा औंध सह 16 गावातील लोकांच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी   दत्ताभाऊंनी  उपोषणाचा निर्धार केला आहे.
राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समिती यांनी 21 जून 2024 रोजी या प्रकल्पाचा 430.50 कोटी रुपये किमतीच्या मूळ प्रशासकीय मान्यता अहवालाची शिफारस केली आहे 22 ऑगस्ट 2024 रोजी 16 गावांना उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठीवला आहे. मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी या योजनेच्या प्रस्तावास मान्यता दयावी आशी मागणी दत्ताभाऊ यांनी केली आहे आणि त्यामुळे दत्तभाऊ जगदाळे यांनी बेमुदत उपोषण करत यावेळी ही शेवटची लढाई असून आर या पार. लढेंगे और जितेंगे ही भूमिका ठेवत आज पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ