म्हसवड वार्ताहर
लोकप्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यार्थी व युवकांनी सदर कायद्याचा अभ्यास करावा कारण माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते ॲड. राजु भोसले यांनी केले.
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथील पॉलिटिकल सायन्स विभागाच्या वतीने " लोकप्रशासन आणि कायदे " या विषयावर विद्यार्थी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये "महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा 1999 " व "माहितीचा अधिकार " या कायद्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी ॲड. राजू भोसले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित होते. यावेळी पॉलिटिकल सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. आर. जी. पवार, प्रा. डॉ. महेश सोनवणे, प्रा. डॉ. शरद टिळेकर, प्रा. सयाजी माने , प्रा. डॉ. सुजाता देशमुख , प्रा. अंजली माने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ॲड. राजू भोसले म्हणाले, भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी माहितीचा अधिकार हे एक प्रभावी अस्त्र आहे. शासन व प्रशासनाचे कार्य, त्यांची धोरणे व योजना इत्यादींची माहिती लोकांना या अधिकारामुळे मिळू शकते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. असे सांगुन राजू भोसले पुढे म्हणाले, रॅगिंग हे अक्षम्य कृत्य आणि गुन्हा म्हणून गणले जाते. यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगासह अनेक राज्यांनी त्यांच्या स्तरावरून कायदे केले आहेत. या मुळे विद्यार्थ्यांनी रॅगिंग सारखे प्रकार करू नयेत आणि इतरांनाही करू देऊ नयेत. यात विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दिक्षित म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून आपला शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करून व्यक्तिमत्व विकास करावा. असे सांगून प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनी ॲड. राजू भोसले यांनी परिश्रम आणि संघर्षातून व्यक्तिमत्व विकास केल्याचे सांगितले व राजू भोसले यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी " पॉलिटिकल सायन्स विभाग" व प्रा. पवार आर. जी. यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करून अल्पोपाहार देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला "लोकप्रशासन व कायदा" या शैक्षणिक प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. रमेश बोबडे, प्रा.डॉ. जितेंद्र बनसोडे , प्रा. विकास चंदनशिवे , प्रा. डॉ. नितिन भालके, प्रा. पोपट साळुंखे, प्रा. डॉ. चंद्रकांत टकले, प्रा. मिलिंद शिंगाडे, प्रा. आर. जी. पवार, प्रा. डॉ. महेश सोनवणे, प्रा. डॉ. शरद टिळेकर, प्रा. सयाजी माने , प्रा. डॉ. सुजाता देशमुख , प्रा. अंजली माने या मान्यवरांसहित बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. जी. पवार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रा. डॉ. जितेंद्र बनसोडे यांनी केले. शेवटी आभार प्रा. सयाजी माने यांनी मानले.
.jpg)
0 टिप्पणियाँ