बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचें रंगले, कुर्ल्यात बाल -लोककला प्रशिक्षण






मुंबई वार्ताहर 

     बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष   एड निलम शिर्के -सामंत यांच्या प्रेरणेतून बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेनें एक दिवसाचे 'बाल- लोककला प्रशिक्षण कार्यक्रम  घेतला .
गांधी बालमंदिर कुर्ला( पश्चिम) या शाळेंत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण  कार्यक्रमात प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतींपूजन व नटराज पूजन करण्यात आले.
त्यानंतर गांधी बाल मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तवन आणि स्वागत गीत सादर केले. बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांनी प्रास्ताविक केलें. .गांधी बाल मंदिर शाळेचें मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी प्रशिक्षक प्रा.डॉ. शिवाजी वाघमारे ,बृहन्मुंबई शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलें. शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांनीही बृहन्मुंबई शाखेतर्फे प्रमोद पाटील , साखरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलें. ज्योती निसळ यांनी आपल्या मनोगतांत लोककला म्हणजे काय? आणि हे प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश काय हे विशद केलें.
    प्रशिक्षक प्रा.डॉ.शिवाजी वाघमारे यांनी आपल्या खड्या, कणखर आवाजांत गण ,भारुड, गोंधळ सादर करत मुलांनाही आपल्या गाण्यांत आणि पदन्यांसांत सामावून घेतलें.'जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल' ,'ओम नमो 'ओम नमो 'च्या जयघोषांत सगळींच मुलें तल्लीन झालीं होतीं. नंतर दुस-या प्रशिक्षक माननीय उल्का दळवी यांनी लावणी शिकवायला सुरुवात केलीं. आणि मुलांनीही त्यांच्याबरोबर लावणीचा आणि शेतकरी नृत्याचा  ठेका धरला. मुलांच्या उत्साहांत आणि जल्लोषांत एक दिवसाचें प्रशिक्षण संपन्न झालें. बृहन्मुंबई शाखेचें सहकार्यवाह  हनुमान पाडमुख यांनी आभार मानलें.
     बृहन्मुंबई शाखेचें अध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष सागवेकर, कार्याध्यक्षा ज्योती निसळ, कार्यवाह आसिफ अन्सारी, सहकार्यवाह हनुमान पाडमुख, कोषाध्यक्षा यशोदा माळकर ,सदस्य लव क्षीरसागर, गणेश तळेकर, महेश कापडोस्कर ,देवू माळकर या सर्वांच्या सहकार्याने हा सुंदर कार्यक्रम पार पडला.अर्थातच गांधी बालमंदिर शाळेचें मुख्याध्यापक प्रमोद पाटील , कोळंबेकर, साखरें,बारनाळें,जाधव,शिर्के, केसरकर  ,शिंदे ,सावंत ,पालकर या सर्व   शिक्षक वृंदांच्या प्रयत्नांमुळेच हा अतिशय देखणा कार्यक्रम यशस्वीं झाला.
  शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील सर यांनी बालरंगभूमीं बृहन्मुंबई शाखेनें आम्हाला हीं मौल्यवान संधी दिली म्हणून शाखेचें आभार मानलें. जवळजवळ २५०मुलांच्या प्रचंड प्रतिसादात एक अभूतपूर्व कार्यक्रम आज आम्ही पाहिला, अनुभवला असेही प्रांजळपणे त्यांनी प्रतिपादन केलें. 'जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र -गीतानें कार्यक्रमाचीं सांगता झाली.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ