# उद्यापासून तारळीचे पाणी मायणी परिसरात सुटणार #
* आ. जयकुमार गोरे , डॉ. दिलीपराव येळगावकर यांचे प्रयत्न *
...................................
म्हसवड वार्ताहर....
खटाव तालुक्यातील मायणी परिसरातील गावांसाठी तारळी योजनेचे पाणी गुरुवारपासून सोडण्यात येणार आहे. आ. जयकुमार गोरे आणि मा. आ. दिलीपराव येळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन त्वरित पाणी सोडण्याचे आदेश सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरुवारी तारळीचे पाणी खटाव तालुक्यासाठी सोडण्यात येणार आहे.
खटाव तालुक्यातील काही भागातील तलाव, ओढे, नदी नाले भरून घेण्यासाठी व शेतीचा पाणीप्रश्न दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी मा. आ. डॉ. येळगावकरांकडे तारळीचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी केली होती. तालुक्यातील मायणी, वाघमोडे तलाव, मोराळे, अनफळे ,माळीनगर ,धोंडेवाडी ,सूर्याचीवाडी, पिंपरी, पळसगाव या परिसरात तारळीचे पाणी तातडीने सोडावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केल्यानंतर येळगावकरांनी तात्काळ आमदार जयकुमार गोरे यांच्याशी पत्रव्यवहार करून कळवले. आ. गोरे यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्या व पाणी एकाच दिवसात सोडण्याचे आदेश दिले आहेत.
खटाव तालुक्यातील अनेक तलाव कोरडे असून तारळीच्या पाण्यावर अनेकांची शेती अवलंबून आहे. शेती पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी अनेक शेतकरी पाण्याची वाट आतुरतेने पहात होते. आजपासून पाणी सुटणार असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी माजी आमदार डॉक्टर येळगावकर व आमदार जयकुमार गोरे यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.
.jpg)
0 टिप्पणियाँ