आज म्हसवड रथयात्रा, प्रशासन सज्ज.


आज म्हसवड रथयात्रा, प्रशासन सज्ज.


म्हसवड : प्रतिनिधी.
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ व जोगेश्वरी देवांची रथ यात्रा आज बुधवार दि.२७ रोजी होत आहे.
यात्रेसाठी सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले असून प्रशासकीय यंत्रणा सेवेसाठी सज्ज झाली आहे.
म्हसवड नगरपालिकेचे कर्मचारी यात्रेसाठी युध्द पातळीवर काम करीत आहेत. शहरात पाणी पुरवठा, स्वच्छता,वीज पुरवठा इत्यादी सुविधा देण्यासाठी शासन काम करीत असल्याची माहिती, नुकतीच नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी दिली आहे.
शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढली असून रथ मार्गावरील अतिक्रमणे व दुकाने काढल्यामुळे वाहतूक सुरळीतपणे होणार आहे.
शहरात जादा पाणी पुरवठा करण्यात आल आहे. यात्रेत टँकर द्वारे करण्यात येत आहे.यात्रा पटांगणात नळ कनेक्शन देण्यात आली आहेत.
  वीजेच्या तारांची तपासणी करुन खांबाला प्लास्टिक कव्हर लावले आहेत.
तसेच यात्रा काळात दहिवडी,पळशी, माळशिरस वीज पुरवठा केंद्रातून ऐनवेळी वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
यात्रा काळात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे वीज मंडळाच्या अधिकारी यांनी सांगितले.
शहराच्या बाहेर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असून यात्रेच्या मुख्य दिवशी शहरात वाहने सोडली जाणार नाहीत. शहरा बाहेर सात ठिकाणी पार्किंग सोय केली आहे. शहराच्या बाहेरून वाहनांच्या वाहतूक व्यवस्था केली आहे, यामुळे कोंडी होणार नाही.
पोलीस स्टेशन तर्फे टेहाळणी टावर उभारण्यात येणार असून १५० जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत,जादा ५० महिला पोलीस कर्मचारी मागणी म्हसवड पोलिसांनी केली आहे.
शहरातील गटारे,रस्ता, सफाई करण्यात आली आहेत, शहरात फॉगींग करण्यात आले असून निरजंतुकरण करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छता गृहे स्वच्छ केली असून फिरत्या शौचालयाची सोय केली आहे. २० फीरते शौचालय उपलब्ध करण्यात आली आहेत. शहरातील महत्वाच्या ठिकाणी ही शौचालये ठेवण्यात आली आहेत.
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राने शहरात  तीन आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. चार  अम्बुलन्स तयार ठेवण्यात येणार आहेत.एक अम्बुलन्स रथापुढे ठेवण्यात येणार आहे. एक यात्रा पटांगणात एक ठेवण्यात येणार आहे. दोन फीरत्या ठेवण्यात येणार आहेत.१३ ठिकाणी चे पाणी नमुने तपासणी करून घेतली. रिपोर्ट नॉर्मल आहेत.
शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून मंदिर परिसरात जादा पोलीस नेमले आहेत.
यात्रेकरु साठी जि.प.शाळा, सिध्दनाथ हायस्कूल, क्रांतीवीर विद्यालयात राहण्याची सोय करण्यात आली आहे.
आपत्कालीन विभाग कार्यरत असून जादा पोलीस चौकी तयार केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ