परिवर्तन महाशक्तीची खटाव माणची उमेदवारी प्रहारला...स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज..वरिष्ठांकडे दाद मागणार*


प्रतिनिधी वडूज: विनोद लोहार 

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खटाव आणि माण तालुक्यामध्ये चांगली ताकद आहे 50 ते 60 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गाव पातळीवर दोन्ही तालुक्यांमध्ये शाखा आहेत या शाखांमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढवय्ये कार्यकर्ते तयार केलेत त्यामुळेच वेगवेगळ्या शेतमालाच्या पिकांच्या लढाया स्वाभिमानी ताकतीने जिंकले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना उसाची आंदोलने आक्रमकपणे करून 2500 रुपयांवर चादर 3100 पर्यंत नेण्यात यशस्वी झाली आहे. तर जिल्ह्याच्या इतर कारखानदारांना सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खटावच्या टीमचा मोठा दसका घेतला आहे. आल्याचा आंदोलन सुद्धा यशस्वी करून एकत्रित खरेदीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदेशीर परिपत्रक काढण्यामध्ये यश मिळवलं. त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकतीने लढणार अशी चर्चा होती. त्या दृष्टीने स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्याने गावोगावी बांधणी सुद्धा सुरू केली होती. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या मतदारसंघांमध्ये लढली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची भीती व्यक्त होत होती. तर दुसरीकडे प्रहार चे संस्थापक बच्चू कडू यांनी ही जागा प्रहारच्या कोट्यात घेऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे स्वाभिमानीचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्या नाराज पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून खटाव मान मतदार संघ लढण्याचा इरादा स्पष्ट जयसिंगपूर मधील ऊस परिषद झाल्यानंतर आपण या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊ असा आश्वासन दिल्यामुळे आता सगळ्यांना जरा स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे लागले आहेत. स्वाभिमानी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ लढवणार होती. शेतीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न शेतमालाच्या लढाया आणि गावोगाव संघटनेची बांधणी यामुळे हा मतदारसंघ लढण्याबाबत शेतकऱ्यांच्याकडून संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वर मोठा दबाव होता. मात्र हा हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये प्रहार ला गेल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला नाराजी आली आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानी राज्य प्रवक्ते अनिल पवार लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांच्याही अपेक्षांवर पाणी फिरले आहे. आता परिवर्तन महाशक्ती मध्ये बंडखोरी करून उमेदवार अर्ज भरणे एवढा एकच पर्याय त्यांच्यापुढे शिल्लक राहिला आहे. त्यामुळे खटाव मान मतदार संघातील स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा मेळावा तातडीने घेतला जाणार असून याबाबत कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून पुढची भूमिका ठरवली जाणार असल्याचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ