माण तालुक्यातील राजकारण.. वार्तापत्र.......धनगर व मराठा आरक्षण महत्वाचे मुद्दे.....शरद पवार यांचची भुमिका महत्वाची ठरणार....


माण तालुक्यातील राजकारण.. वार्तापत्र..
.....

धनगर व मराठा आरक्षण महत्वाचे मुद्दे.
....
शरद पवार यांचची भुमिका महत्वाची ठरणार......
.........
आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्व गट एकत्र येऊन लढणार..
......

म्हसवड विजय टाकणे...

माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेला आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार असणाऱ्या जयकुमार गोरे यांचे पारडे जड असून भाजप तर्फे त्यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केलेली आहे .
मात्र विरोधकांनी अद्याप याबाबत व भूमिका जाहीर केले नसून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी अद्याप भूमिका जाहीर न केल्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
 मागील निवडणुकीत शिवसेनेमधून शेखर गोरे हे निवडणूक रिंगणात होते मात्र या वेळेला शिवसेना त्यांना पुन्हा तिकीट देणार किंवा ही जागा राष्ट्रवादीला सोडणार याबाबत  चर्चा सुरू आहेत. गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणारे आमदर जयकुमार गोरे यांनी २०१९ मध्ये मागच्या वेळेला तीन हजार मताच्या फरकानं विजय मिळवलेला होता .
तर त्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस मधील असणारे प्रभाकर देशमुख यांनी आमचं ठरलं या मधून अपक्ष उमेदवारी लढवलेली होती या वेळेला अपक्ष उमेदवार असताना त्यांना मिळालेली मते पाहता
 या वेळेला त्यांना राष्ट्रवादी पुन्हा उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू आहे.
 मात्र अद्यापही या चर्चेला पूर्णविराम मिळालेला नाही .
खरंतर गेल्या वेळेला सगळे तालुक्यातील नेते आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकत्र असताना ते विजयी झाले.
२०१९  मध्ये शेखर गोरे हे एकमात्र उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात स्वतःच्या ताकतीवर शिवसेनेमधून लढलेले होते .
 शिवसेनेची ताकद त्यांनी दाखवून दिलेली असून मागच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना मिळालेल्या मताच्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा त्यांना शिवसेना तिकीट देणार असे चित्र निर्माण झालेले आहे.
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा निम्मा गट हा शरद पवार यांच्याकडे तर निम्मा गट हा अजित पवार यांच्याकडे विभागलेला आहे. यामुळे राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे .यामुळे राष्ट्रवादी आता पुढच्या उमेदवाराच्या शोधात असून नक्की उमेदवारी कोणाला देणार याबाबत शंका निर्माण झालेली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे कायम एकनिष्ठ असणारे विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना पुन्हा एकदा माण खटाव  मधून उमेदवार मधून राष्ट्रवादी रिंगणात उतरवणार अशी चर्चा सुरू आहे .

 २०१९ वेळीच्या परिस्थितीपेक्षा सध्याची परिस्थिती अत्यंत वेगळी असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे विकास कामाच्या ताकदीवर आमदार जयकुमार गोरे यांनाही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा सुरू आहे . आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी तगडा उमेदवार शोधण्यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत.
आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात 
भविष्यात उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची चाचपणी सुरू आहे .
शरद पवार यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून माण तालुक्यात अद्यापही उमेदवाराचा शोध सुरू आहे . रासप पक्षाने स्वतंत्र  निवडणूक लढविण्याची भुमिका घेतली आहे. रासप उमेदवार स्वतंत्रपणे जाहीर करणार असून रास प मधून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नुकतीच चाचपणी करण्यात आली आहे .यामध्ये रासप मधून बबनदादा विरकर व त्यांचे सहकारी असणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका तपासणी केली आहे.
 रासप उमेदवारी कोणाला देणारी याबाबत चर्चा आहे तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे उमेदवारीसाठी इच्छुक असून राष्ट्रवादी व रासप या दोन्ही पक्षाकडून त्यांचा उमेदवारी साठी प्रयत्न सुरू आहे .अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षांने तिकीट दिलं तर आपण सहज जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.
माण तालुक्यातील गावागावात अनिल देसाई यांनी सभा घेऊन वातावरण निर्माण केले आहे.

 तर गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेस मधून इच्छुक असणारे प्राध्यापक विश्वंभर बाबर ही सध्या राष्ट्रीय काँग्रेस मधून इच्छुक आहेत तर राष्ट्रीय काँग्रेसतर्फे हरणाई सहकारी सूतगिरणीचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख हे पण राष्ट्रीय काँग्रेस मधून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत .
माण तालुका हा पूर्वाश्रमी राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसला तिकीट मिळावं अशी आग्रही भूमिका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेतली आहे.  शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी मधून तिकीट कुणाला जाणार याबाबत निर्णय झाल्यामुळे माण खटाव तालुक्यात नेमका हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे जाणार की उबाटा शिवसेनेकडे जाणार.? याबाबत निर्णय झालेला नाही उबाटा शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेल्यास शिवसेनेचे मागील वेळचे उमेदवार शेखर भाऊ गोरे यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. .

आमदार जयकुमार गोरे पारडं जड.

माण तालुक्याचा राजकारण हे पाणी प्रश्नावर गेल्या पन्नास वर्षापासून सुरू असून पाणी प्रश्नाचे काम अखेरच्या टप्प्यामध्ये आणण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून अनेक कामे पूर्णत्वाकडे नेलेले आहेत यामुळे आमदार जयकुमार गोरे यांचे मताधिक्य या वेळेला वाढणार असे चित्र निर्माण झालेले आहे. वास्तविक पाहता विरोधकांमध्ये असणारी विभागणी याचा फायदा आमदार जयकुमार गोरे यांना नक्की होणार असून आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये विरोधकांमध्ये असणाऱ्या फुटीचा फायदा घेऊन ते सतत तीन वेळा निवडून आलेले आहेत .
यावेळी त्यांची ही चौथी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ते बाजी मारणार अशी मतदार व नेत्यांमध्ये चर्चा हे मात्र नक्की काय होणार आगामी काळातच उमेदवाराच्या ताकदीवर ठरणार आहे 

 धनगर व मराठा आरक्षण महत्वाचे ठरणार?

धनगर आरक्षण व मराठा आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे या वेळेला ठरणार असून धनगर समाजाला भारतीय जनता पार्टीने आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली होती मात्र अद्याप या भूमिकेवर भारतीय जनता पार्टीने कोणताही निर्णय घेतल्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून धनगर समाज हा माण तालुक्यामध्ये निर्णायक समाज असून माण तालुक्यामध्ये धनगर समाजाचे मताधिक्य सर्वाधिक आहे . याच बरोबर मराठा समाज हा इतर समाजाच्या मानाने सर्वाधिक मतदार असणारा समाज असून माण आणि खटाव तालुक्यामध्ये साधारण 45 टक्के समाज हा मराठा समाज आहे. यामुळे मराठा समाजाचे मतदार 
 जी भूमिका घेणार त्या भूमिकेवर आगामी निवडणुकीची गणित अवलंबून आहेत.
 मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टाळाटाळ केल्यामुळे व मागणीनुसार आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. मराठा समाजाची भूमिका या मतदारसंघांमध्ये अतिशय निर्णायक ठरणार आहे. मराठा समाज एक झाला तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो.
 यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय सावध पावले उचलत असून मराठा समाज दुखावणार नाही यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत.
मात्र या निवडणुकीमध्ये मराठा समाज व धनगर समाज यांच्या मतावर माण खटाव तालुक्याचा आमदार विजयी होणार आहे हे मात्र निश्चित.
.....

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ