वाचन संस्कृती रक्षक पोलीस अधिकारी


ललित लेख
——————————————
लेखन. प्रा.जगताप.

वाचन संस्कृती वाढवणारे पोलीस अधिकारी...


——————————————
पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे नेहमी व्यस्त असणारी.सुट्टी काढावी म्हणली, तरीही काढता येत नाही.आपआपल्या हद्दित कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्परच असावे लागते,मग तो पोलीस शिपाई असो किंवा पोलीस अधिकारी .बदलत्या काळात आपले कर्तव्य बजावत असतांना व कायद्याचे रक्षण करतांना अनेक राजकीय,सामाजिक दबावातून नाजुक परिस्थिती हाताळण्याचे काम पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना करावे लागते.कांही —कांही घटनात तर तपास करतांना त्यांना आपली ताकद पनाला लावावी लागते.यासाठी ते नेहमिच तत्पर असतात यात शंका नाही.आज पोलीसाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोण म्हणावा तसा सरळ नाही.कांही मोजक्या कर्मचारी यांचेमुळे अनेक चांगल्या पोलीस अधिका—यांना एकसारखेच पाहिले जाते.खरं तर "पोलीस जनतेचा मिञ...!"ही विचार धारा जर समाजात रुळली तर गुन्हेगारी  कमी व्हायला मदत होईल.परंतु पोलीसाकडे पहाण्याचा समाजाचा सरळ दृष्टीकोण नसल्याने त्यांच्या दिवस राञीच्या ड्युटी आपण लक्षात घेत नाहित.त्यांच्या व्यथा व वेदना लक्षात घेत नाही. सगळ्यांच्याकडे आपण एकाच चष्म्यातून पहात असल्याने आपणास सगळेच पोलीस कर्मचारी एकसारखेच वाटायला लागतात.आपण जर एक चांगला दृष्टीकोण ठेऊन पोलीसांकडे चांगल्या नजरेतून पाहिल्यास त्यांच्यातल्या माणुसकीकडे निट पाहिल्यास. कांही पोलीस अधिका—यातील, चांगल्या माणसांचे दर्शन घडते.
आठ सप्टेंबर ला माझी"गाव तेथे बुध्द—विहार"कादंबरी उस्मानाबाद येथे प्रसिध्द झाली होती.त्या बातम्या विविध वर्तमान पञातून प्रसिध्द झाल्या होत्या.दै.संघर्ष मधील बातमी दि.९/९/१९ रोजीची  मा.भिमराव व्हेवळ पोलीस निरीक्षक ढोकी पोलीस स्टेशन,ता.जि.उस्मानाबाद यांनी वाचली होती.कादंबरीच्या शीर्षकावरून त्यांना ती कादंबरी खुपच भावली होती.त्याच दिवशी सायंकाळी मला त्यांचा मेसेज आला होता.साहेब अभिनंदन! व मला आपल्या कादंबरीच्या दहा प्रती हव्या आहेत.माझ्या हद्दीतील कांही ग्रामस्थांना मला भेट द्यायच्या आहेत व त्यांचे वाचन मला वाढवायचे आहे.
एक पोलीस अधिकारी कादंबरी वाचतो आहे.दहा प्रती खरेदीकरून परिसरातील ग्रामस्थांना वाटतो आहे.आणि वाचन संस्कृती वाढवतो आहे.एक लेखक म्हणून मला त्यांचा विलक्षण असा हेवा वाटला.एक अधिकारी येवढ्या कामातून थोडा वेळ काढून वाचन संस्कृती वाढवायला मदत करतोय म्हणल्यावर मी त्यांना आनंदाने फोन केला आणि त्यांनी मला ढोकीला येण्याचे निमंञण दिले होते.त्या पध्दतीने मी सात आॅक्टोंबरच्या सुट्टिचा योग जुळवला आणि कादंबरीच्या प्रती घेऊन उस्मानाबाद येथून माझ्या मोटर सायकलने भ्रमंती साठी उस्मानाबाद—औरंगाबाद हायवे ने निघालो.आज पांढरे ढग भरून आले होते.दूरवर काळंकुट्ट आभाळ दिसत होतं.पावसळा संपत आलता तरी म्हणावा तसा पाऊस उस्मानाबादला अद्याप झाला नव्हता.पण जेमतेम पावसावर हीरवी पिकं डोलतांना दिसत होती.शिंगोली शिवारातील भल्या मोठ्या माळरानावर हीरव्या गवताचं पांघरून आंथरलेलं...! मनमोहक हीरवं सौंदर्याचं लेणं मनाला मोहत होतं.उपळा पाटीवरचा उड्डान पुल ओलांडतांना रेल्वे स्टेशनकडच्या तळ्यातील पाणी नजरेत भरत होतं.गड पाटी,विमानतळ,पाटी जवळचा डोंगर...ते माळरान हीरवाईत नटलेलं दिसत होतं.त्या हीरवळीवर मनसोक्तपणे जनावरं चरत होते.गुरंराखी मनसोक्तपणे त्या हीरवळीवर बसलेले दिसत होते.छोटे तळे पाण्याने भरले होते.त्यात कांही म्हशी पाण्यात बसलेल्या दिसत होत्या.त्या म्हशीवर टोच्या मारणारे पांढरे बगळे दिसत होते.मध्येच एखादी वा—याची झूळुक आली की,उंच वाढलेलं हीरवं गवत हालायचं आणि निसर्गाचं दर्शन घडायचं.हीरवळीवर बागडणारे पक्षी,आकाशात उंच उडणारे रानची पाखरं.विविध पक्षांचा किलबीलाट...!मी.गाडी रस्त्याकडेला लाऊन सगळं मुक्तपणाने ते न्याहळत होतो.खरच माणसांनी आशा मुक्त वातावरणात येऊन दोन तास घालवायला कांहिच हरकत नाही.
आशा वातावरणाचा आस्वाद घेत असतांनाच अचानकच आभाळ झाकोळून यायचं...!क्षणात ऊन पडायचं!ऊन सावल्यांच्या या खेळातच मी ढोकी येथील पोलीस स्टेशनात पोहचलो.दूपारच्या दीड वाचल्या असतील नेमकी साहेबांची जेवनाची वेळ असेल.त्यांना दहा प्रती कादंबरीच्या द्यायच्या आणि निघायचं आसं पाच मिनिटाचंच काम होतं.साहेबांचा अगोदर माझा कसलाही परीचय नव्हता. तेथे कोणी तरी महीला पोलीस कर्मचारी होत्या .त्यांना मी माझा परीचय सांगीतला .भिमराव व्हेवळ साहेबांना भेटायचय असे सांगितले तेंव्हा त्या मॅडमणी आत जावा सांगितले. पुस्तकाची पीशवी घेऊन साहेबांना आत येऊ का?म्हणून त्यांच्या केबिनमध्ये दाखल झालो.साहेबांना म्हणालो..."मी,प्रा.राजा जगताप!" आसं म्हणताच साहेबांनी
अगदी अदराने बसायला सांगितलं. त्यांच्या समोरच्या एका रिकाम्या खुर्चिवर बसलो.साहेबांनी लगेचच त्यांचेजवळची पाण्याची बिसलरी दिली.मी थोडसं पाणी पिलो.आणि दोघात विविध विषयावर चर्चा रंगली. पोलिस निरीक्षक पदाला शोभेल अशी शरीर येस्टी व कणखर बोलणं.बोलण्यातला आत्मविश्वास,समाजाबद्दलची तळमळ,भारतीय संविधानावरील निष्ठा. कायदा सुव्यवस्था सांभाळतांना होणारी दमछाक.हे संगळं सागत होते.मी फक्त ऐकतच होतो.आजच्या तरूणांचे वाचन कमी झाले आहे.वाढती बेकारी,त्यातूनच गुन्हेगारी हे थांबायचे असेल तर आजच्या तरूणांना वाचायलाच लावले पाहिजे तरच त्यांचेवर चांगले संस्कार होतील.एक पोलीस अधिकारी असे विचार सांगतात म्हणजे हा पोलीस अधिकारी वाचन संस्कृती वाढवण्याचे काम करतोय हे माझ्या लक्षात आलं.त्यांचे बद्दल व त्यांच्या विचारा बद्दल मला बरं वाटलं.
गाव तेथे बुध्द विहार कादंबरी चाळतांनाच म्हणाले"जगताप साहेब, या कादंबरीचे शीर्षकच बरच कांही सांगते ...बुध्दाचे विचार यात मांडलात हे पुस्तक तरूणांनी वाचलेच पाहिजे .उद्या आठ तारखेला दसरा आहे.आमच्या ढोकी येथील बुध्द विहारात मला पाहुणे म्हणून बोलावले आहे.तेंव्हा ही पुस्तके. मी तेथे, वाटप करून ,समाजात वाचन सस्कृती वाढवणार आहे!"
त्यावर मी त्यांना म्हणालो. "व्हेवळ साहेब ,असे तुमच्या सारखे पोलीस अधिकारी फार दुर्मिळ आहेत.हे करण्यासाठी वेळ कसा काढता?"
त्यावर ते म्हणाले,"मी या अगोदर जालना जिल्ह्यातील परतूरला होतो त्यावेळी तेथे मी समाजातील कोणत्याही जाती जमातीचा माणुस असो त्यांना भारतीय संविधानाची पुस्तके विविध कार्यक्रमातून मोफत वाटायचो.कारण आज आपण शिकलोत.चांगल्या पदावर आहोत पण समाज सुधारला पाहिजे यासाठी थोडी तरी तळमळ आपण केली तर आपणासही समाधान मिळेल"
खरच आशा विचारातून जर बाकिच्या अधिकारी यांनी असे काम केले तर समाजाच्या जडण,घडणीत आपलाही खारीचा वाटा होऊ शकतो.व्हेवळ साहेबांची ही वाचन संस्कृती चळवळ अनेक गोष्टी शिकवते.एक तर गोर,गरिब ,सामान्य माणसात जायला शिकवते,त्यामुळे त्यांच्या समस्या कळायला लागतात, वाटप केलेल्या पुस्तकांचे वाचन करणारे चार—पाच जरी तयार झाले तर त्या परिसरात चांगले सुसंस्कारित तरूण घडायला मदत होते.एक मोठ्या पदावरील अधिचारी व सामान्य माणूस यांच्यातली दरी कमी होते.
साहेबांचे हे कार्य मला खुपच भावले!
दुस—या दिवशी ढोकी येथील बुध्द विहारात साहेब पाहुणे म्हणून गेल्या नंतर तेथे ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत भगवान बुध्द यांचे प्रतिमांचे पूजन करतात आणि भाषण करण्या अगोदर तेथील कांही पांढ—या साडीतील महीला,पुरूष,तरूण,वयस्क स्ञीया यांना गाव तेथे बुध्द विहार कादंबरी भेट देऊन विजया दशमी कृतीतून साजरी करतात.ही बाब कौतुकास्पद व इतर अधिकारी यांना विचार करायला लावणारी आहे.
लगेचच ९/१०/१९रोजी ढोकी परीसरातील दहा पोलीस पाटलांना भारतीय संविधान कळावे यासाठी, ते संविधानाचे वाटप करतात आणि पोलीस पाटलांनाही वाचन संस्कृतीत सामील करून घेतात.त्या परिसरातील पोलीस पाटलांनाही व्हेवळ साहेबांचा हा उपक्रम आवडतो.
सात तारखेला त्यांच्याशी विविध विषयावर आजच्या बदलत्या परिस्थितीवर खुप चर्चा झाली त्यांचेशी बोलतांना दीड तास कसा गेला कळाले नाही,त्यांना भेटायला कांही तक्रारदार बहुतेक आलते. ते ताटकळत बसले असावेत असे मला वाटले आणि त्यांचा निरोप घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो.आभाळ गच्च भरून आलं होतं.पाऊस आता गाठणार वाटत होतं आणि तसच झालं.आळणी पाटीजवळ आल्यावर जोरदार पाऊस सुरू झाला.पण त्या पावसात भिजण्याचा आजचा वेगळाच आनंद होता.एक पोलीस अधिकारी पुस्तके खरेदी करतो आणि वाचन संस्कृती वाढवतो.ही बाब माझ्यासाठी खुपच लेखक म्हणून वेगळी होती.आम्ही शाळा,महाविद्यालयात २७फेब्रुवारीला वि.वा.शिरवाडकरांच्या जन्म दिनी...मराठी राजभाषा दिन साजरी करतांना असे वाचन संस्कृती मेळावे नियमित वाचन करणा—या विद्यार्थ्यांसाठी घेतो.पण भिमराव व्हेवळ साहेबां सारखे अधिकारी वाचन संस्कृती वाढवण्सासाठी नियमितपणे धडपडतात.हे विशेष म्हणावे लागेल.या संदर्भात येवढेच म्हणेन...
"वाचन संस्कृती वाढवणारे मा.भिमराव व्हेवळ साहेब!"
त्यांच्या या उपक्रमाला सलाम!

प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
मो.नं.९८८११८८२६३

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ