विवाह सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज, हजारो भाविक येणार दर्शनासाठी
.
2 डिसेंबर 2024 रोजी म्हसवड रथयात्रा होणार.
म्हसवड, : म्हसवड येथील प्रसिद्ध असणाऱ्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा आज रात्री बारा वाजता मध्यरात्री शाही पद्धतीने संपन्न होणार आहे या शाही विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या राज्यातील अनेक भक्त उपस्थित असतात रात्री बारा वाजता हा शाही सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न होत असतो.
या वेळेला या सोहळ्यासाठी विविध भागातले भाविक उपस्थित राहणार आहेत .
मध्यरात्री बारा वाजता मंगलाष्टका म्हणून पारंपारिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने हा विवाह सोहळा दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवशी संपन्न होत असतो. अतिशय पारंपारिक पद्धतीने असणारा हा विवाह सोहळा पाहण्यासाठी आणि विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशीस (तुळशी बारस) बुधवारी (ता. १३) मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीनेहोणार आहे.
या पारंपरिक सोहळ्याच्या तयारीची लगीनघाई मंदिराचे पुजारी व मानकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. 'श्रीं'च्या विवाह सोहळ्यास प्रत्येक वर्षी सुमारे ५० हजारांहून अधिक संख्येने भाविकांची उपस्थिती राहते.भाविकांच्या सुविधेसाठी मंदिराची दर्शनबारी यासह मंदिर व परिसरात स्वच्छता, रंगरंगोटीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. यानिमित्त मंदिर शिखर व आवारातही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पारंपरिक सोहळ्याचा प्रारंभपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्रीं'ची घटस्थापना, हळदी लावणे व विवाहानिमित्त भाऊबीजेस फटाक्याच्या आतषबाजीत 'दिवाळी मैदान' (श्री म्हातारबाबा मंदिरास सालकरी व मानकरी यांच्या भेटीचा कार्यक्रम) हजारो भाविक व महिलांच्या उपस्थितीत मोठ्याथाटात झाला. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर 'श्रीं'च्या अभ्यंगस्नानानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशद्वारानजीकच्या श्री म्हातारबाबा मूर्तीच्या समोर मंदिराचे सालकरी महेश बुरंगे गुरव व सालकरीण शुभांगी गुरव यांच्या हस्ते विविध धान्यांचा समावेश असलेल्या बीजारोपणाच्या घटस्थापनेने करण्यात आला.त्यानंतर हत्ती मंडपात 'श्रीं'च्या पंचधातूंच्या उत्सवमूर्तीना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ उत्साहात झाला. भाऊबीजेस सालकरी, मानकरी व पुजारी गुरव मंडळींसमवेत राजबागेतील श्री म्हातारदेव मंदिरात भेटीसाठी 'दिवाळी मैदान' ढोलाच्या निनादात झाले.
घटस्थापना होताच भाविकांनी नित्य पहाटे सलग बारा दिवस अनवाणी पायी चालत नगरप्रदक्षिणा उपक्रम सुरू ठेवला असून, या उपक्रमाची सांगता याबरोबरच मंदिरातील म्हातारबाबा देवाच्या मूर्तीसमोर स्थापित केलेले घट उठविण्यात येणार आहेत. यावेळी बारा दिवसांचे दिवसरात्र उभे राहून सुरू ठेवलेल्या उपवासाचीही सांगता करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सांगता देवदिवाळीस (शनिवार, ता. दोन डिसेंबर) विवाहानंतरची वरात अर्थात रथातून नगरप्रदक्षिणा मिरवणुकीने होते. या रथयात्रेस प्रत्येक वर्षी सुमारे पाच लाख भाविक उपस्थित असतात..
रथोत्सव 2 डिसेंबर रोजी होणार आहे..
......
म्हसवड येथील प्राचीन असणाऱ्या श्री सिद्धनाथ मंदिर दहाव्या शतकामध्ये बांधलेले असून चालुक्य राजाच्या काळातील हे मंदिर आहे इथं श्री सिद्धनाथ जोगेश्वरी च्या मूर्ती स्थापन केलेल्या असून या मूर्ती अखंड दगडामध्ये कोरीव काम करून तयार केलेले आहेत सभामंडळ प्रचंड मोठा असून या सभा मंडपामध्ये श्री सिद्धनाथ जोगेश्वरी ची विवाह सोहळा संपन्न करण्यात येतो या वेळेला आज विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री सिद्धनाथ मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून या परिसरामध्ये रांगोळी काढून व दिव्यांची आरास करून हा परिसर सुशोभित करण्यात येत असतो यासाठी पुजारी मंडळी व गुरव मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेत असतात अनेक भाविक यासाठी उपस्थित राहून श्री सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा पार पडतो यावेळीला शास्त्रोक्त पद्धतीने मसवड येथील पद्माकर शास्त्री व त्यांचे सहकारी पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा करत असतात आणि या वेळेला मंगलाष्टका म्हणून विवाह सोहळा करतात मंगलाष्टकानंतर ज्या अक्षता आहेत त्या अक्षदा शुभ शकुन मानून अनेक भाविक आपल्या घरी या अक्षदा घेऊन येतात या विवाह सोहळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने मानकरी असणारे म्हसवड येथील राजमाने घराण्याचे वंशाचे उपस्थित असतात याचबरोबर कराड भागातील डुबल मानकरी म्हसवड व भागातील माळी सुतार लोहार या मानकरी यांची उपस्थिती असते.
.....
.jpg)
0 टिप्पणियाँ