लोणंद: प्रतिनिधी:
लोणंद पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की तारीख 14 नोवेंबर 2019 रोजी रात्री साडेआठ वाजता गणेश महादेव शिंदे वय वर्ष 22 पुणे स्टेशन कडून पल्सर मोटर सायकल नंबर एम एच 12/42 36 यावरून फलटण कडे जिंती या गावी मित्राच्या कडे जाण्यासाठी निगाला होता.
लोणंद तालुका खंडाळा येथील राधेश्याम वजन काटा समोर त्याच्या मोटारसायकलला लेलँड छोटा हती क्रमांक एम एच 11 बीएल 38 84 ने ठोकरले.
यात गणेश शिंदे जागेवर ठार झाला.
चालक विनोद शंकर सपकाळ 44 यावर निष्काळजीपणा करुन वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत झाले बद्दल गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लेलँड ड्रायव्हर विनोद सपकाळ स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला आहे व त्यास अटक केली आहे गुन्हा क्रमांक 342 कलम 294 304 अ मोका कलम 184 नुसार पोलीस स्टेशनला नोंद केला आहे.

.jpg)
0 टिप्पणियाँ