लोणंद शहरात उद्धव ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत

 लोणंद शहरात  उद्धव ठाकरे यांचे जल्लोषी  स्वागत



लोणंद: प्रतिनिधी:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे लोणंद शहरामध्ये सायंकाळी साडेसात वाजता आगमन अहिल्याबाई पुतळा चौकात झाले.
यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून ते म्हणाले शेतकऱ्यांच्या   नुकसान भरपाई देण्यासाठी शिवसेना तत्पर आहे.
 अखंडपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार राहील, कर्ज माफीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.शेतकरी बांधवांनी आत्महत्या कडे प्रवृत्त होऊ नये.
चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
 आजच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे ते म्हणाले.
यावेळी सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयराव शिवतारे, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर,शिवसेनेचे जेष्ठ नेते पुरुषोत्तम जाधव, खंडाळा चे तहसीलदार जाधव वाईच्या प्रांताधिकारी मॅडम, त्याचबरोबर खंडाळा आणि सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ