पुस्तके हेच आपले गुरु आहेत: नितीनशेठ दोशी.

पुस्तके हेच आपले गुरु आहेत: नितीनशेठ दोशी.


म्हसवड:
पुस्तके हेच आपले गुरु आहेत, उतम वाचन हे जीवन बदलून टाकते, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे विचार माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी यांनी व्यक्त केले.
म्हसवड येथे पुस्तक विक्री प्रदर्शनात ते बोलत होते.
संताजी घोरपडे क्रिडा मंडळ, प्रभात शाखा व राष्ट्रीय स्वंयंम सेवक संघ शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड येथील म.फुले चौकात धार्मिक पुस्तके विक्री करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष तुषार विरकर माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी, युवराज सुर्यवंशी यांच्या हस्ते या पुस्तकाच्या विक्री चा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पत्रकार विजयराव टाकणे,मार्तंड गुरव,बाळासाहेब खाडे, बबन अब्दागिरे,लूनेश विरकर, विजय माने,किरणशेठ कलढोणे,
शेखर पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
संघाचे कार्यवाह रामचंद्र नरळे,संजय भागवत,राजेंद्र खाडे,अनील रोकडे ,प्रवीण दोशी यांनी परिश्रम घेतले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ