अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचा सन्मान

दोरगेवाडी पाणी फाऊंडेशन कडून अहिंसाचा सन्मान

म्हसवड: प्रतिनिधी:


जलसंधारणाच्या वॉटर कप स्पर्धेत दोरगेवाडीने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.
अहिंसा पतसंस्थेने दोरगेवाडी ग्रामस्थांना जलसंधारणाच्या कामासाठी आर्थिक मदत केली होती त्याचबरोबर संचालक मंडळ व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष दोरगेवाडी येथे जाऊन श्रमदान केले व पतसंस्थेचा मदतीचा धनादेश माण चे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे हस्ते ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आला होता.
   दोरगेवाडी ग्रामस्थांनी नुकताच वॉटर कप स्पर्धेतील यशाबद्दल आनंदसोहळा साजरा केला.
या पाणी चळवळीतील जलपुत्रांचा सन्मानचिन्ह, फेटा व हार देऊन सन्मान करण्यात आला.
   दोरगेवाडीचे सरपंच दादासाहेब दोरगे यांचे हस्ते माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिनभाई दोशी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले दोरगेवाडी ग्रामस्थांनी अहिंसा पतसंस्थेच्या योगदानाची जाणीव ठेवून जो आमचा सन्मान केला त्याबद्दल जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत, ही पाणी चळवळ या पुढेही सुरू ठेवावी  व आजूबाजूच्या परिसरातही त्याचा प्रसार व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी,दोरगेवाडी सरपंच श्री दोरगेसाहेब , विपुलशेठ दोशी व अहिंसा पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ