म्हसवड: प्रतिनिधी:
सुपली ता. पंढरपूर येथे स्वीप्ट कार कैनॉल मध्ये पडुन झालेल्या अपघातात म्हसवड येथील एकजण ठार झाला आहे.
अधिक माहिती अशी,
म्हसवड येथील ,एअरटेल कंपनी चा वितरक ,मोबाईल दुकानदार अजिंक्य नंदकुमार ढोेले (वय32) आपल्या मित्रासोबत पंढरपूर येथे आपल्या स्वीप्ट कार मधून जात होता. अचानक सुफली.ता. पंढरपूर येथे दुचाकी स्वार आडवा आला त्यास वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटला. यातच गाडी कैनॉल मध्ये पडली. यात तो गंभीर जखमी झाला. आसपास च्या लोकांनी गाडीतून त्यास बाहेर काढले. गंभीर जखमी झाल्याने अजिंक्य ढोले मृत झाला.
त्याच्या सोबत असलेले स्वप्नील भीमराव टाकणे व मनोज भोजणे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

.jpg)
0 टिप्पणियाँ