"२१ रोजी म्हसवड येथे सनानतन संस्थेच्या धर्मरथाचे आगमन"

"२१ रोजी म्हसवड येथे सनानतन संस्थेच्या धर्मरथाचे आगमन"



म्हसवड: प्रतिनिधी:
सनानतन संस्थेचा धर्म प्रसाररथ धर्मरथ २१ रोजी म्हसवड येथे येत आहे.
म्हसवड येथील महात्मा फुले चौकात हा थांबणार आहे.
२१ व २२ रोजी हा धर्म रथ म्हसवड येथे उपलब्ध आहे.
बलात्कार, भ्रष्टाचार, आंतकवाद इत्यादी समस्या मूळे जनता हैराण झाली आहे. वैयक्तिक जीवनात नैराश्य आले असून अनेकजण समस्याग्रसत झाले आहेत.
अडचणीच्या प्रसंगात आनंदी जीवन कसे जगावे ,हे समजून सांगणारी सनातन ची ग्रंथ संपदा आणि सात्त्विक उत्पादन यांचा धर्म रथ म्हसवड येथे येत आहे.
प.पु.डॉ.जयंत बाळाजी आठवले यांनी मानवी जीवनासाठी आदर्श आणि आधारस्तंभ ठरेल अशी ग्रंथसंपदा संकलीत केली आहे. आपले जीवन आनंदी कसे राहील, मुलांवर कोणते संस्कार करावेत,नमस्कार करण्याच्या पध्दती, आयुर्वेदिक औषधे, केशरचना, धार्मिक विधी, शास्त्र काय सांगते,इ.बाबतचे ग्रंथ या धर्म रथा मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
धर्म रक्षण व तणावमुक्त जीवन यासाठी हे उपयुक्त ग्रंथ व धार्मिक साहित्य या रथा मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सर्व धर्म प्रेमीनी या धर्म रथा ला भेट द्यावी, असे आवाहन या निमित्ताने सनातन संस्थेच्या सेवकांनी केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ