लोणंद येथे मंगळसूत्र चोरी,
लोणंद: प्रतिनिधी:
दुधवाल्याचा नातेवाईक असल्याचे सांगून एका महिलेचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना येथील शेळके गल्लीत घडली आहे.
19 नोव्हेंबर रोजी लोणंद येथील शेळके गल्ली येथे सकाळी दहाच्या सुमारास अनोळखी इसमाने शांताबाई केशव घोडके हिस मी दूधवाला यांचा नातू आहे असा बहाणा करून विश्वास संपादन करुन तिच्या कडून तीन तोळ्याचे मंगळसूत्र व दोन पत्री काळे पिवळे म्हणी असलेले फोटो काढण्यासाठी घेतले. व काही वेळेमध्ये मोटारसायकलवरून लंपास झाला.
मंगळसूत्र परत न करता हा इसम पसार झाल्याने
सदर महिलेचा मुलगा सुरेश याने लोणंद पोलीसात तक्रार केली आहे.
अधिक तपास पोलीस हवलदार दिघे करीत आहेत.

.jpg)
0 टिप्पणियाँ