'खाकी वर्दीच्या माणुसकी मुळे हवरविलेली चिमुकली आई वडीलांच्या कुशीत'



'हवालदार बागल यांच्या माणसुकीमुळे ,हरविलेली चिमुकली आई वडिलांच्या कुशीत'

म्हसवड, दि. 21 (प्रतिनिधी) : म्हसवड पोलिस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस संतोष बागल यांनी माणुसकीचे दर्शन घडवत हरवलेलया दोन वर्षांच्या चिमुकलीला पाच तास तपास करून तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला. यानंतर सपोनि गणेश वाघमोडे साहेब यांचे हस्ते चिमुकलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिली. खाकी वर्दीने माणुसकीचे दर्शन घडवल्याने बागल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास म्हसवड एस.टी.बसस्थानकात एक दोन वर्षांची मुलगी रडत असून तिला तिची आई बसस्थानकासमोर सोडून गेली आहे, अशी माहिती कॉलेजच्या मुलींकडून म्हसवड पोलिस ठाण्यातील ट्रॅफिक पोलीस संतोष बागल यांना समजली. बागल यांनी तातडीने पोलिस मित्र सुमित बोडरे, सचिन बोडरे, होमगार्ड नवनाथ वनवे, तुषार खांडेकर, यांना बरोबर घेऊन सपोनि गणेश वाघमोडे यांना याबाबत माहिती देऊन बसस्थानकातून चिमुरडीस ताब्यात घेतले. ती चिमुरडी घाबरली होती. तिची चौकशी केली असता ती सानी नाव सांगत होती व रडून मला आईकडे जायचे आहे, अशी म्हणत होती.
संतोष बागल यांना या मुलीची केविलवाणी स्थिती पाहून त्या लहानग्या जीवाला खांद्यावर घेऊन तिला खाऊ दिला. यानंतर म्हसवड शहरात तिच्या आई वडिलांचा तपास सुरू केला. पाच तास शोध घेवूनही कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, सोशल मिडियावर मुलीचा फोटो वायरल केला. बसस्थानकमधून दर दहा मिनिटांनी हरवलेल्या मुलीबाबत स्पीकरवरून पुकारत होते. सोशल मिडियावरून ही अनेक जण शोध घेत होते. मुलगी मला आईकडे जायचे आहे, असे म्हणत रडत होती. तिच्या आई-वडिलांचा तपास लागत नाही. या विवंचनेने नेहमीच खाकी वर्दीतल्या संतोष बागलही भावनाविवश झाले. त्यांनी मुलीला कडेवर घेऊन तपास चालूच ठेवला होता. अखेर त्यांना मुलीच्या आई वडिलाना शोधून काढण्यात यश आले व तब्बल पाच तासांनी चिमुरडी सानिया आई-वडिलांच्या कुशीत विसावली. यावेळी सानिया आणि आईच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहात होत्या.
म्हसवड येथील फुलेनगर येथे गरीब दाम्पत्य सौ. पुजा व निलेश बेंद्रे यांची कु.सानिया ही चतुर्थ कन्या आहे. सौ. पुजा घरकाम करतात.  आज त्या मोठी मुलगी देवश्रीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. यावेळी सानिया पाठीमागून आली होती ते सौ. बेंद्रे यांच्या लक्षात आले नाही. सध्या सिध्दनाथ यात्रा 27 रोजी असल्याने बसस्थानक परिसरात गर्दीत सानिया हरवली व हा प्रकार घडला.
चिमुकल्या सानिया हिस म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे यांचे हस्ते ट्रॅफिक पोलीस संतोष बागल यांच्या उपस्थितीत आई वडिल व चुलते यांचे कडे सोपविण्यात आले. संतोष बागल यांच्या कामगिरीचे जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, बी. बी. महामुनी, सपोनि गणेश वाघमोडे आदींनी अभिनंदन केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ