सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेजच्या शिवानी नवनाथ मरगळे द्वितीय क्रमांक तर ओमकार विलास दोलताडे यांने तृतीय क्रमांक मिळविला

 


सातारा शिक्षण विभागाने मार्फत  शालेय मुलांच्या तालुका स्तरावरील नुकत्याच योगासन स्पर्धेत 



म्हसवड प्रतिनिधी  

सातारा शिक्षण विभागाने मार्फत  शालेय मुलांच्या तालुका स्तरावरील नुकत्याच योगासन स्पर्धा दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेण्यात आल्या या मध्ये म्हसवड येथील सिध्दनाथ  हायस्कूल व ज्युनियर काॅलेज मधील शिवानी नवनाथ मरगळे द्वितीय क्रमांक तर ओमकार विलास दोलताडे यांने तृतीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाल्या बदल प्रशालेच्या वतीने दोघांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आले

     सातारा शिक्षण विभागाने मार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरावरील स्पर्धेचा शेवट योगा या स्पर्धेने करण्यात आला या स्पर्धेत एकूण २२ विद्यार्थी विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता जिल्हास्तरीय स्पर्धा असल्याने या स्पर्धेला मोठी चुरस लागली होती असताना या स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वयोगटातील कु. शिवानी नवनाथ मरगळे या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक तर दुसऱ्या १९ वर्षीय ओमकार विलास दोलताडे याने तृतीय क्रमांक मिळवत या दोघानी मिळवलेल्या घवघवीत यशाचे व या दोघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बदल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज म्हसवड स्कूल कमिटचे चेअरमन हेमंत वसंतराव रानडे, व्हा चेअरमन अॅड. श्रीमंत पृथ्वीराज विजयसिंह राजेमाने, सदस्य श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक-निंबाळकर,. रमणलाल आनंदलाल दोशी

 नितीन सुभाष दोशी, निमंत्रित सदस्य श्रीमंत शिवराज आबासाहेब राजेमाने, संभाजी भाऊसाहेब माने  विपुल विनोद दोशी,. अरविंद सखाराम निकम, सचिव व प्राचार्य

 प्रविण उत्तमराव दासरे व क्रिडा शिक्षक यांनी यशस्वी 

विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ