वडूजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयात हंगामा...



शेती वहिनीवरील घरगुती कनेक्शनवरील  सक्तीच्या भारनियमन विरोधात आंदोलन...

वडूज : शेती वहिनीवरील घरगुती कनेक्शनवर केले जाणाऱ्या सक्तीच्या भारनियमन विरोधात खटाव तालुक्यात गेले पंधरा दिवस लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होती, दोन तीन वेळा अधिकाऱ्यांना समजावून सांगून सुद्धा भारनियमन बंद झाले नव्हते.त्यामुळे आज आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.कार्यकारी अभियंता श्री म्हस्के यांना धारेवर धरत कार्यकर्त्यांनी कृषी वाहिनीवरील घरगुती कनेक्शनचे सक्तीचे भारनियमन कधी बंद करणार तेवढे सांगा असं म्हणत गोंधळ घातला. थ्री फेज कनेक्शन ला सध्या चार ते सह तास लोड शेडिंग केले जात आहे. खरीप हंगामात पिके अंतिम टप्प्यात आहेत. त्यांचे मोठे नुकसान होत आहे .  दुसरीकडे सिंगल फेज कनेक्शनवर सुद्धा महावितरण वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे.  त्यामुळे मळे भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांची अभ्यास करताना कुचंबना होत आहे. त्याचबरोबर सध्या ग्रामीण भागामध्ये चोरांच्या अफवांचे पेव फुटले आहे . त्यामुळे तातडीने शेती वाहिनीवरील भारनियमन बंद करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण कंपनी कार्यालयांना टाळा ठोकेलं असा इशाराही यावेळी देण्यात आला.राज्यात 1 हजार मेगावॅटचा तुटवडा आहे, त्यामुळे सक्तीच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. तुमच्या भावना तातडीनं वरिष्ठ कार्यालयाला कळवून सक्तीचे भारनियमन बंद करण्याचा प्रयत्न करू अस आश्वासन देण्यात आले. यावेळेला मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

अनिल पवार 
राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना...

पावसाळा सुरू असताना जर विजेचा तुटवडा होत असेल सत्तेत असताना भाजप सरकारने काय केलं? हा आमचा सवाल आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस केवळ वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करत असतात ?  मग त्या फसव्या असतात, हे उघड झाले आहे. पावसाळ्यात एवढा मोठा विजेचा तुटवडा निर्माण होत असेल तर  सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत वीज निर्मिती क्षेत्रामध्ये काहीच सुधारणा केल्या नाहीत. त्यामुळे हे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही...
यावेळी प्रदेश युवा सरचिटणीस सूर्यभान जाधव, खटाव तालुका अध्यक्ष दत्तू काका घार्गे, वडूज शहर प्रमुख महेश गोडसे,  तालुका पक्षाध्यक्ष वैभव पाटील, कोअर कमिटी सदस्य संतोष बागल, सोशल मीडिया प्रमुख अमोल मोरे, विजय देवकर, अजय पाटील, यांच्यासह  विविध गावचे स्वाभिमानी पदाधिकारी आणि महिला शेतकरी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ