विरोधकांकडे कोट्यावधी रुपये आहेत पण माझ्या पाठीशी लाखो बहिणीचे आशीर्वाद आहेत
आमदार जयकुमार गोरे यांचा विरोधकांवर टोला.
म्हसवड वार्ताहर....
विरोधाकाकडे कोठ्यावधी रुपये असतील पण माझ्याकडे माझ्या कोट्यावधी बहिणीचे आशीर्वाद आहेत असे भावनिक उद् गार आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे झालेल्या महिला सन्मान मेळाव्यात व्यक्त केले.
म्हसवड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने भव्य महिला व लाडकी बहीणचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.
अनासपुरे मीडिया यांच्या सहयोगाने म्हसवड येथे या वेळेला संस्कृती बानगुडे यांचा नृत्य आविष्कार मनोरंजनाचा कार्यक्रम व हास्य जत्रा फेम हास्य वीर गौरव मोरे, वनिता खरात श्रवणी महाजन, चेतन लोखंडे, संदिप पाटील यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर,सौ. सौनिया गोरे, अप्पासाहेब पुकळे, शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, विजय सिन्हा , सौ.सुवर्णा पोरे, सुरेश म्हेत्रे , प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळेला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या उपस्थित महिलांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार जयकुमार गोरे हे चौथ्यांदा आमदार होतील असा विश्वास या वेळेला उपस्थिती वरुन स्पष्ट झाले.
यावेळेला बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले ,आतापर्यंत मी पाण्याच्या संघर्षाची लढाई केली होती यामध्ये मला मोठे यश आले असून माणच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे .माण तालुक्यातील मातीमध्ये ऊसाची लागवड व्हावी आणि साखर कारखान्याचे धुराड अखंड पेटत राहो हे माझं स्वप्न आहे.
माझ्या मातीतील शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे आणि माण तालुक्यातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी माझा हा संघर्ष आहे . माझा पराभव करण्यासाठी
विरोधक कोट्यावधी रुपये असल्याचे सांगून मतदारांना आमिष दाखवत आहेत .मात्र त्यांच्या आमिषाला माण आणि खटाव मधील स्वाभिमानी जनता कधीही भिक घालणार नाही .
आज कोट्यावधी महिलांनी दिलेले आशीर्वाद हेच मला जिंकून देतील असा विश्वास त्यांनी या वेळेला व्यक्त केला .
या वेळेला ते पुढे म्हणाले, माझ्या माता-भगिनांचा आशीर्वाद हाच माझ्यासाठी मोलाचा आहे .
महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी योजना या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपये हप्त्याचं दरमहा येणारी मदत ही महिला भगिनींच्या भविष्यासाठी असून महाराष्ट्राचे सरकार हे माता-भगिनींचा आदर करणारे सरकार आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. असून या योजनेतून एक ही बहिण वंचित राहणार नाही यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावांची देखील मला साथ असल्यामुळे विरोधक किती जरी एकत्र झाले आणि आमचं ठरलंय म्हणाले तरीसुद्धा माझा विजय निश्चित आहे. असा आत्मविश्वास त्यांनी या वेळेला बोलून दाखवलेला आहे .
माता भगिनी यांच्या आशीर्वादामुळेच मी गेल्या वर्षी झालेल्या अपघातातून बचावलो. माण तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी देवाने मला नवं आयुष्य दिले आहे.
विरोधकांना मात्र माझ्यावर टीका करण्यासाठी कोणतेही कारण नाही .
केवळ विरोधासाठी विरोध आहेत. माझा सल्ला आहे.. विकासाचे बोला.. टीका करत बसू नका.
बहिणी नो आता यापुढे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. यापुढे हा खंबीरपणे असणारा भाऊ तुमच्या पाठीशी आहे.
असा विश्वास त्यांनी या वेळेला बोलून दाखवला.
यावेळी महिलांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्याचा जयजयकार करत धन्यवाद दिले.
.jpg)
0 टिप्पणियाँ