माणदेशी विद्यार्थी प्रचंड सामर्थ्यशाली ...... प्रा. विश्वंभर बाबर

माणदेशी विद्यार्थी प्रचंड सामर्थ्यशाली 
 ......         प्रा. विश्वंभर बाबर 

 म्हसवड..   प्रतिनिधी 
 खडतर परिश्रम करून यशाचा कळस गाठणारे माणदेशी विद्यार्थी प्रचंड सामर्थ्यशाली असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.
             म्हसवड येथील डॉ. ऋषिकेश अनिल कुमार स्वामी व  डॉ. शोएब अहमद मुल्ला या विद्यार्थ्यांनी फिलिपाईन्स देशात वैद्यकीय  क्षेत्रातील एम.बी बी एस. पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्था सचिव सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे, पत्रकार अहमद मुल्ला ,  प्रा. अनिल कुमार स्वामी , सौ. योगेश्वरी स्वामी ,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी बोलताना प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले माणदेशातील विद्यार्थी खरोखरच सामर्थ्यशाली असल्याचे डॉक्टर  ऋषिकेश स्वामी व डॉक्टर शोएब मुल्ला यांनी दाखवून दिले आहे. जिद्द, चिकाटी तसेच स्काय इज लिमिट या तत्त्वाचे ध्येय बाळगल्याने  या दोघांनी जीवनातील यशाचे शिखर हस्तगत केले आहे.  या माध्यमातून सत्कार मूर्ती दोन  माणदेशी   डॉक्टर सुपुत्रांनी  माणदेशाचा  डंका साता   समुद्रापलीकडे  वाजवला आहे.
 विद्यार्थ्यांनो     सत्कारमूर्ती मान्यवराकडून  प्रेरणा घ्या. आजच जीवनातील ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने अभ्यासाच्या माध्यमातून वाटचाल करा असे आवाहन प्रा. बाबर यांनी केले.
           या निमित्ताने मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, यांनी  शिक्षक म्हणून तर सौ.योगेश्वरी स्वामी, पत्रकार अहमद मुल्ला  यांनी पालक म्हणून अत्यंत भावनिक मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती डॉ. शोहेब मुल्ला, व डॉ. ऋषिकेश स्वामी यांनी  फिलिपाईन्स देशातील शिक्षण पद्धती तसेच त्या ठिकाणी आलेले अनुभव विद्यार्थ्यांसाठी कथन केले.
 प्रस्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार  प्रा. पल्लवी शिंदे यांनी व्यक्त केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ