Epaper माणदेशी न्यूज 22/11/2024.
______________________________________
मतमोजणी निमित्त दहिवडीत उद्या, मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर "नो - एंट्री"
दहिवडी ( चैतन्य काशिद प्रतिनिधी)-
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनिमित्त शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी २५८ माण - खटाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम दहिवडी (मायणी रोड ) ता.माण,जि.सातारा या ठिकाणी होत असून निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे मतमोजणी ठिकाणच्या भोवतालचा परिसर केवळ पादचारी क्षेत्र (Pedestrian Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार (माण) यांनी मतमोजणी ठिकाणच्या पूर्वेस,पश्चिमेस,दक्षिणेस आणि उत्तरेस या चतु: सीमेमधील ५०० मीटर अंतर्गत भाग केवळ पादचारी क्षेत्र Pedestrian zone ) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी सकाळी सहा ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीच्या मार्गात पुढील प्रमाणे बदल केला आहे.
१.एस.टी.स्टैणप्ड दहिवडी ते मायणी चौक व तेथून मायणी विटा बाजूकडे जाणारी व येणारी वाहने वाहतुक बंद करण्यात आली आहे.
या वाहतुकीचा पर्यायी मार्ग म्हणून हएस.टी.स्यॅण्ड दहिवडी येथून पिंगळी बद्धक व तेथून सातारा ते पंढरपूर जाणारे रोडने खांडसरी चौक
दहिवडी व तेथून मायणी विटा बाजूकडे.
२.एस.टी. स्टॅन्ड दहिवडी येथून गोंदवले बुद्रुक व पुढे सोलापूर बाजूकडे जाणारी वाहने यांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
या रोडचा पर्यायी मार्ग म्हणून एस.टी.स्टैण्ड ते दहिवड़ी ते पिंगळी बुद्रुक व तेथून सातारा पंढरपूर रोडने गोंदवले बुद्रुक व पुढे सोलापूर बाजूकडे.
३.राणंद,मार्डी या गावांत
येण्याकरीता व जाण्याकरीता नेहमीचा रोड बंद करण्यात आला आहे.
राणंद,मार्डी या गावात जाण्याकरता येण्या करता पर्यायी मार्ग म्हणून
एस.टी.स्टॅन्ड दहिवडी ते फलटण चौक व पुढे दहिवड़ी ते शिंगणापूर रोडने पुढे कादरशहा बाबा दर्गा रोडला आणि पुढे दहिवडी
गांवच्या हद्दीत असलेल्या दहिवडी गावाकडे जाणाऱ्या माणगंगा नदीच्या पुलावरून पुढ़े, राणंद मार्डी बाजूकडे.
प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणे,मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन,कॉर्डलेस फोन,लाऊड स्पीकर, मेगा फोन,वायरलेस सेट आधी बाळगण्यास, वापरण्यास अथवा मतमोजणी गोपनीयता भंग होईल अशी कृती करणे. मतमोजणी केंद्रातील निवडणूक प्रतिनिधी,मतमोजणी प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी,मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे, मतमोजणीच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे त्या कृत्यांना मनाई केली आहे आणि मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व प्रकारच्या आस्थापना,दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे.
.jpg)
0 टिप्पणियाँ