म्हसवड दि. २३
माण - खटाव विधानसभा मतदार संघातुन आ. जयकुमार गोरे यांनी घेतलेली मतांची आघाडी रोखण्यात विरोधकांना सफशेल अपयश आल्यानेच आ. गोरे हे येथुन चौथ्यांदा विजयी चौकार मारणार असल्याचा आनंदोत्सव म्हसवड शहरातील त्यांचे खंदे समर्थक मानले जाणार्या सुनील पोरे व त्यांच्या सहकार्यांनी साजरा करीत फटाके व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
यावेळी बोलताना इंजि. सुनील पोरे म्हणाले की आ. गोरे यांच्यावर माण - खटावमधील सामान्य जनता ही खुप मनापासुन प्रेम करते, आ. गोरे हे दिलेला शब्द पाळणारा नेते म्हणुन ओळखले जातात, त्यांनी निवडणुकीपुर्वीच माणच्या उत्तर भागातील गावांना पाणी देण्याचा शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पुर्ण तर केलाच पण म्हसवडकरांनाही त्यांनी जे शब्द दिले होते त्याची पुर्तता करुनच त्यांनी म्हसवडकर जनतेला मते मागितली होती. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी त्यांची राजकिय ओळख बनल्यानेच आज म्हसवड पालिकेच्या माध्यमातुन पालिका हद्दीत कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरु आहेत या कामाची पोहच पावती मताधिक्य देवुन म्हसवडकर जनतेने त्यांना दिले आहे.
आ. गोरे हा कामाचा माणुस सामान्यांचा माणुस ही प्रतिमा जनमानसात कायम राहिल्यानेच सामान्य जनतेने ही निवडणुक हाती घेतल्याचे यावेळी दिसुन आल्याचे पोरे यांनी सांगितले.
संपूर्ण मतदार संघात आ. गोरे यांच्या प्रचारार्थ आपण जेव्हा फिरत होतो तेव्हा सामान्य जनतेची आ. गोरे यांनी किती कामे केली आहेत याची प्रचिती आम्हाला आली, तेव्हाच आ. गोरेंचा विजय होईल याची खात्री आम्हाला वाटली होती. आ. गोरे यांनी विजयाचा याठिकाणी चौकार मारलेला असल्याने आता निश्चितच त्यांना भाजपकडुन मोठे बक्षीस दिले जाईल असा विश्वासही यावेळी पोरे यांनी व्यक्त केला.
फोटो -
.jpg)
0 टिप्पणियाँ