आटपाडी प्रतिनिधी
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यामध्ये विभुतवाडी ता. आटपाडी जि.सांगली येथील सदाशिव तुकाराम पुकळे यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वा.रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ शालिमार जवळ नाशिक येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
यामध्ये सदाशिव तुकाराम पुकळे यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे सदाशिव पुकळे यांना करण्यात आले आहे.
.jpg)
0 टिप्पणियाँ