'बावधन येथे ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार'
सातारा:
वाई सातारा रस्त्यावर सातारहून वाई कडे येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला .
वाई सातारा रस्त्यावर बावधन गावच्या हद्दीत वाकेश्वर मंदिराजवळ सातारा होऊन वाईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रक च्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक देत ट्रक एका सर्विस सेंटर मध्ये घुसला. याअपघातात वाई होऊन पाचवड च्या दिशेने जाणारे प्रसाद उर्फ पप्पू मधुकर सुतार ( वय ३५,सिद्धनाथ वाडी वाई) हा युवक डोक्याला मार लागून जागीच ठार झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला संतोष सहदेव जावळे (महागणपती पुलानजीक वाई )हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ठार झालेला प्रसाद सुतार हा सिद्धांत वाडी सिद्धनाथ वाडी येथील युवक कार्यकर्ता होता.त्याच्या अपघाताचे वृत्त येताच गीतांजली रुग्णालय परिसरात सिद्धनाथ वाडीतील व शहरातील युवक व ग्रामस्थानीं मोठी गर्दी केली होती. या अपघातात माल ट्रकचेही पूर्ण नुकसान झाले. प्रसाद सुतार याच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
(सौजन्य:-सातारा माझा न्यूज)
0 टिप्पणियाँ