म्हसवड वार्ताहर...
माण तालुक्यातील जांभुळणी येथे सोप्यात जेवण करून बाप लेक बोलत बसले असतांना जिर्ण झालेले माळवाद घराचे छत अंगावर पडून एका ८० वर्षीय वृध्दाचा जगीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मरगु तुका काळे वय ८० असं मृत्यु झालेल्या वृध्दाचे तर मारुती मरगु काळे वय ५५ असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती . रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास जांभुळणी येथील धनगरआळी येथे मरगु तुका काळे व मुलगा मारुती मरगु काळे हे राहत्या घरी रात्री जेवण करून सोप्यात बोलत बसले होते. रात्री ७. ३० वाचण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. आणि अचानक त्यांच्या अंगावरती जुने जिर्ण झालेले माळवादाचे घराचे छत पावसामुळे पडले . यात मरगु काळे व मारुती काळे हे मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडले गेले.अचानक झालेल्या आवाजाने आजुबाजुच्या लोकांनी घटना स्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस पाटील सुभाष नरळे यांनी त्या बापलेकांना बाहेर काढले.
यामध्ये मरगु काळे यांचा मातीत दबून मृत्यू झाला. तर मारुती काळे यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. त्या दोघाना ही म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मरगु काळे यांना मृत घोषीत केले. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच माण खटावच्या विभागीय अधिकारी उज्वला गाडेकर , तहसीलदार विकास आहिर , सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार , सर्कल निवृती केळकर , तलाठी आकडमल , सरगर , मासाळ , पोलिस पाटील सुभाष काळेल , सरपंच भागवत सरगर , उपसरपंच बापू काळेल पोलिस हवालदार एस एन. भोसले , महिला पोलिस हवालदार रुपाली फडतरे धाव घेऊन घटनेची पाहणी केली.
.jpg)
0 टिप्पणियाँ