विहिंपच्या धर्माचार्य व्यापक बैठकीत समस्त महाराज मंडळींची आग्ऱही भूमिका

 वारीत अर्बन नक्षलवाद शिरलाय सावधान, या घुसखोरांना प्रतिबंध करा।

विहिंपच्या धर्माचार्य व्यापक बैठकीत समस्त महाराज मंडळींची आग्ऱही भूमिका


सोलापूर, दि. 9 जुले : 

(विशेष प्रतिनिधी, तभा वृत्तसेवा), 

सावधान, वारीत अर्बन नक्षलवाद शिरलाय, हिंदू संस्कृती आणि विचार तोडण्याचा डाव हा आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर, येत्या काळात वारी, दिंडी आणि  आषाढी सोहळ्यामध्ये यांचे घातक प्रदूषण पाहायला मिळेल, अशी भीती व्यक्त करीत समस्त संत, महंत, धर्माचार्य यांनी फड, दिंडीचालकांनी खबरदारी घेतली पाहिजे. सरकारच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून द्यावी तसेच अशा घुसखोरांना वारीत प्रतिबंध करावा, अशी एकमुखी मागणी विश्‍व हिंदू परिषद धर्माचार्य व्यापक बैठक़ीत करण्यात आली. मंगळवारी 8 रोजी पंढरपुरातील कुकुरमुंडे महाराज मठात विठ्ठल महाराज वडगावकर अध्यक्षतेखाली ही बैठक़ पार पडली. विहिंपचे केंद्रीय सहमंत्री हरिशंकरजी यांनी मार्गदर्शन केले.

विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री हरिशंकर बैठक़ीस मार्गदर्शन करताना म्हणाले,  सुरवात आपल्यापासून करुयात. चिंतन झाले पाहिजे, त्यातून समाधान अपेक्षित आहे. नवीन पिढीला काय पाहिजे हे लक्षात घ्या. त्यावर संस्कार झाले पाहिजेत. आस्था, परंपरा जपण्याचा भाव असायला हवा. पंढरपूरचाही विकास झाला पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी मांडली. 

बैठक़ीचे अध्यक्ष विठ्ठल वडगावकर यांनी वारी परंपरेतील घातक विचार ठेचून काढा. पालखी सोहळ्यातील परंपरा जपण्याचे आवाहन करीत  पंढरपुरातील जुन्या मठांना सरकारकडून अनुदान निधी द्या, असेही सुचवले. यात्रा हिंदूंची, लाभार्थी मुस्लिम असे पंढरपुरातील वारीचे चित्र आहे, त्यामुळे ज्याच्या कपाळी गंध, तो आपला बंधू असे समजून खरेदी, विक्री झाली पाहिजे वारीत ढोल ताशे, हलग्या आले आहेत. वाद्यांचे प्रदूषण वारीत नको, पखवाज हे आपले वाद्य आहे, असे आशुतोष बडवे महाराज म्हणाले.

महादेव शास्त्री बोराडे महाराज म्हणाले, प्रयागराजचा कुंभमेळा पॅटर्न वारीत हवा आहे, कारण गर्दीच्या ठिकाणी रस्ते लहान आहे. मोठी दुर्घटना घडू शकते. शिवाय अनेक मंत्री वारीत येत असल्यामुळे त्यांचाही वारकर्‍यांना त्रास होतो. अनिकेत महाराज मोरे (देहू) म्हणाले,  वारीत संविधान दिंडी बुध्दीभेदाचा  प्रकार आहे, सेक्युलर विचार मांडण्याचा खटाटोप घुसखोरांनी केला आहे. विमर्श, अर्बन नक्षलवादचा धोका वेळीच ओळखा. भागवत  चवरे महाराज म्हणाले, वारीत घुसलेल्यांचा वेळीच बंदोबस्त करा. निवृत्ती नामदास महाराजांनी,  वारकरी संप्रदायाने परंपरा जपावी. वारीत गिटार वाजवले जाते. हा निंद्य प्रक़ार आहे. आणखी पुढे कोणकोणती वाद्ये घुसखोर मंडळी आणतील याचा नेम नाही, असे नमूद केले. पुष्कर गोसावी महाराज पैठणकर यांनी वारी करण्यापेक्षा वारी जगा, आचारसंहिता ठरवा. वारीचा दंडक असावा असे सांगितले. प्रकाश जवंजाळ महाराज आक्रमकपणे म्हणाले, हिंदु संस्कृती तोडण्याचा अर्बन नक्षलवाद्यांचा डाव आहे. सप्ताह, वारी, हरिपाठमध्येही त्यांची घुसखोरी झाली आहे. अर्बन नक्षलवाद शिरला आहे. संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा यांचा  विचार संविधानाचा आहे. वारकरी समतेचा विचार मांडतो. कीर्तन, शाहिरी, कवितेतून वारकरी भक्तांचा बुध्दीभेद केला जात आहे. 

रामकृष्ण वीर महाराज यांनी मंदिराचे सरकारीकरण नको अशी मागणी केली, विहिंपची देखील हीच मागणी आहे, मुख्यमंत्र्यांचे भाष्य अस्वस्थ करणारे आहे.  या रे या सारे या, म्हणजे काय? अजेंडा राबवायला वारीत येऊ नका. फड,  परंपरा मजबूत करा, असेही वीर महाराज म्हणाले. रामेश्‍वर शास्त्री यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. यासाठी वारकर्‍यांची चिंतन बैठक घ्या. याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. महेश महाराज देहूकर यांनी वारीत प्रदूषण नको त्या महाराज लोकांचे झाले आहे, असे सांगितले. सनातन हिंदू राष्ट्रचे सुनील घनवट म्हणाले,  पंढरपूरसह राज्यातील अन्य तीर्थक्षेत्र कायम मांस, मदिरामुक्त करा. परशुराम डोंबे महाराज (बार्शी) म्हणाले, फडकरी सुधारला की, वारकरी सुधारतो. महादेव यादव महाराज, अभय कुलकर्णी इचगावकर, संदीपान महाराज हासेगावकर, अक्षय महाराज भोसले, उध्दव महाराज कुकुरमुंडे यांच्यासह अन्य वारकरी महाराज मंडळी यांनीही मनोगत व्यक्त केले. 

धर्माचार्य बै़ठक़ीचे सूत्रसंचालन विहिंप प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख माधवदास राठी यांनी केले. याप्रसंगी धार्मिक विभाग महाराष्ट्र राज्य प्रमुख संजय मुद्राळे, संघटनमंत्री अनिरूध्द पंडित, सहसंपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, समीर पायगुडे, तुकाराम मांडवकर, धनंजय वासाडे (विदर्भ), परशुराम दुबे (कोकण), नंदकुमार कोनाळे (देवगिरी) विहिंप जिल्हाध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज, जिल्हा मंत्री संजय जमादार, शिवाजीराव जाधव, सहमंत्री गोपाळ सुरवसे, बापूसाहेब कदम, अविनाश माने, बजरंग दल संयोजक श्रीनाथ संगीतराव, भाग्यश्री लिहिणे, रेखा टाक, संतोष पापरीकर, प्रवीण कुलकर्णी, कौस्तुभ देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ,  ...........

चौकट : याकडेही बैठक़ीत वेधले लक्ष :  टेंभुर्णी ते  करकंब पंढरपूर रस्ता चौपदरी, कारीडॉर, निर्मलवारी, सरकारची प्रशासन व्यवस्था, पर्यावरण, प्रदूषण, प्लॅस्टिक कचरा निर्मूलन, प्रयागराज कुंभच्या धर्तीवर एक थाली, एक थैली, शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तिथीनुसारच झाला पाहिजे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ