विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पंढरपुरात धर्माचार्य बैठकीचे आयोजन*

 *विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने  पंढरपुरात धर्माचार्य बैठकीचे आयोजन*



पंढरपूर वृत्तसेवा 


 विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि धर्मचार्य संपर्क प्रमुख माननीय हरिशंकर जी यांच्या उपस्थिती पंढरपूरमध्ये कुकुर मुंडे महाराज धर्मशाळा मध्ये धर्मचार्य बैठक आयोजित करण्यात आले या बैठकीमध्ये वारकरी संप्रदायाचे नामांकित संत फडकरी आणि विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा राज्य धार्मिक विभाग प्रमुख माननीय श्री संजय मुद्राळे जी प्रचारात नागनाथ अण्णाभाऊ साठे अनिरुद्ध अण्णा पंडित तसेच जिल्हा मंत्री शिवाजीराव जाधव गोपाळ सुरवसे गजानन दान जिल्हा सहकारी बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ पंडितराव संगीतराव, भाग्यश्री लिहिणे मॅडम ,रेखाताई ताक, संतोष पापरीकर, प्रवीण कुलकर्णी कौस्तुभ देशपांडे आदि विहिपचे कार्यकर्ते उपस्थित होते

या बैठकीमध्ये वारकरी फडकरी आणि अनेक महाराज मंडळीनी विविध प्रश्न धर्माचार्य बैठकीमध्ये उपस्थित केले.

या बैठकीमध्ये पर्यावरण पूरक प्लास्टिक मुक्त वारी,ग्रामीण नक्षलवाद, हिंदू धर्माचे रक्षण,धार्मिक संकटे, मांस आणि मद्यविक्री बंदी अशा अनेक विषयावरती चर्चा करण्यात आली.

सर्वात महत्वाची म्हणजे पंढरपुरातील कोरेडॉर याविषयी सर्व महाराज मंडळी कडून सूचना जाणून घेतले व त्यावर केंद्रीय सहमंत्री,  धर्माचार्य संपर्कप्रमुख माननीय श्री हरीशंकरजी सहमती दर्शवली आणि सर्व वारकरी संप्रदायांना सोबत घेऊन महाराष्ट्र शासना बरोबर पुढील महिन्या बैठक घेऊ आणि पंढरपूरचा विकास पुढील पन्नास वर्षा इतका सुंदर झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ